बँकेसमोर ग्राहकांच्या नाही हो ........ या तर चपलांच्या रांगा

प्रकाश बनकर
Monday, 13 April 2020

बँक सुरू होण्यापूर्वीच शहरातील विविध शाखांसमोर ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या. मुकुंदवाडीतील बँक ऑफ बडोदासमोरही रांगा लागल्या; मात्र त्या ग्राहकांच्या चपलांच्या होत्या. होय, आपण बसमध्ये रुमाल टाकून जागा धरतो त्याचप्रमाणे बँकेत पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी चक्क चपलांच्या रांगा लावल्या होत्या.

औरंगाबाद: केंद्र सरकारने जनधन बचत खात्यामध्ये पाचशे रुपये सानुग्रह अनुदान जमा केले. हे पैसे काढण्यासाठी बॅंकेत गर्दी होत आहे. तीन दिवसांच्या सुटीनंतर सोमवारी (ता. १३) शहरातील बॅंकांसमोर पुन्हा रांगा लागल्या. अनेक बँकांमध्ये गर्दी झाली. काही ठिकाणी ग्राहकांनी शक्कल लढवीत रांगेत स्वतः उभे राहण्याऐवजी आपल्या जागी चप्पल ठेवल्या.

 मुकुंदवाडी येथील बँक ऑफ बडोदासमोर नियमित गर्दी होत आहे. पोलिस असूनही लोक सोशल डिस्टन्स पाळत नाहीत. तीन दिवसांपासून बंद असलेल्या बँका सोमवारी उघडल्या. बँक सुरू होण्यापूर्वीच शहरातील विविध शाखांसमोर ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या. मुकुंदवाडीतील बँक ऑफ बडोदासमोरही रांगा लागल्या; मात्र त्या ग्राहकांच्या चपलांच्या होत्या. होय, आपण बसमध्ये रुमाल टाकून जागा धरतो त्याचप्रमाणे बँकेत पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी चक्क चपलांच्या रांगा लावल्या होत्या. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

जिल्ह्यात महिलांच्या जनधन बचत खात्यांची संख्या पाच लाख ३५ हजार आहे. या खात्यांमध्ये केंद्र सरकारतर्फे २६ कोटी ७५ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. हे पैसे काढण्यासाठी महिलांची बँकांमध्ये मोठी गर्दी होत आहे. हे पैसे काढण्यासाठी महिलांना वेगवेगळ्या तारखा देण्यात आल्या होत्या. असे होऊनही महिलां तर्फे आहे आदेश पाळण्यात आले नाही. यामुळे शहरातील काही बँका बंद कराव्या लागल्या.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा  

पाचशे फुटांपर्यंत चपलांची रांग 
पाचशे फुटांपर्यंत ही चपलांची रांग सोमवारी पाहायला मिळाली. या चपलांच्या रांगेचा फोटो व्हायरल होत आहे. असे असले तरी ग्राहकांनी चप्पल ठेवतानाही सोशल डिस्टन्सचा नियम पाळला आहे. त्यामुळे नळावरील भांडे ठेवून लावले जाणारे नंबर आणि बसमध्ये रुमाल टाकून पकडलेल्या जागेची आठवण होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no queue of customer in front of bank but slippers queue instead of costumer Aurangabad news