शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याचे वेध 

राजेभाऊ मोगल
रविवार, 5 जानेवारी 2020

औरंगाबाद - परतीच्या पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यापोटी शासनाने दुसऱ्या हप्त्यात 1,791 कोटींचा निधी दिला होता. तत्पूर्वी पहिल्या हप्त्यापोटी बाधित शेतकऱ्यांना 819 कोटींचा निधी मिळाला होता. या दोन्ही टप्प्यातील मदत निधीचे वितरण बाधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. आता शेतकऱ्यांना तिसऱ्या हप्त्याचे वेध लागले आहेत.

मराठवाड्यातील बहुतांश भागात सप्टेंबर, ऑक्‍टोबर महिन्यात परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले. यात विभागातील 10 लाख शेतकऱ्यांचे 42 लाख हेक्‍टवरील पिके बाधित झाली होती. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना 3,250 कोटींची मदत द्यावी, असा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाने शासनाकडे पाठवला होता.

हेही वाचा -  शाळेत उपलब्ध सॅनिटरी नॅपकिन अन्‌ चेंजिंग रूम

यानंतर शासनाने शेतकऱ्यांना हेक्‍टरी आठ हजार तर फळबागांसाठी 18 हजारांची मदत जाहीर करीत 11 नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात 819 कोटींचा निधी दिला होता. त्यानंतर दुसऱ्या हप्त्यापोटी 1,791 कोटींची नुकसानभरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 266 कोटी, जालन्यासाठी 240 कोटी, बीड 315 कोटी, लातूरसाठी 220 कोटी, उस्मानाबादसाठी 117 कोटी, नांदेडसाठी 269 कोटी, परभणीसाठी 191 कोटी तर हिंगोली जिल्ह्यातील बांधित शेतकऱ्यांसाठी शासनाने 117 कोटीचा निधी दिला होता.

हेही वाचा -   एसटी महामंडळाची हिटलरशाही

प्राप्त मदत विभागीय आयुक्त कार्यालयाने तातडीने तालुकानिहाय तहसीलदारांकडे वर्ग केल्याने ती बाधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात आली. विभागातील बाधित शेतकऱ्यासांठी आतापर्यंत 3,250 पैकी 2,570 कोटींची मदत मिळाली आहे. उर्वरित तिसऱ्या टप्प्यातील मदत नव्याने स्थापन झालेल्या सरकारकडून कधी मिळते, याची शेतकरी वाट पाहत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Third installment payout to farmers