ढाबे चालकांसाठी डबल धमाका! थर्टी फर्स्टसोबत ग्रामपंचायत निवडणुकीचा उडणार धुरळा

dhaba
dhaba

करममाड ( जि.औरंगाबाद) : चार दिवसांवर थर्टी फस्ट आल्याने हाॅटेल व धाबा चालकांनी मोठी तयारी केल्याचे चित्र आहे. यातच ग्रामपंचायतीच्या निवडणुका येऊन ठेपल्याने धाबा चालकांसाठी हा डबल धमाकाच म्हणावा लागेल. यामुळे लाॅकडाऊनची कसर भरून निघण्यास मदत होणार आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे लाॅकडाऊनच्या काळात सर्वाधिक फटका हा हाॅटेल्स व धाबा चालकांना बसला होता. यात कित्येकांचा रोजगार हिरावला गेल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. हाॅटेल्स व धाबा मालकांनाही मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागले.

लाॅकडाऊन उघडल्यानंतरही हाॅटेल व्यवसायास लवकर परवानगी मिळू शकली नाही. त्यामुळे नुकताच हा व्यवसाय सोशल डिस्टन्शिंगचे नियम पाळून कसबसा सुरू झाला होता. मात्र, यास पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही.

थर्टी फस्ट तोंडावर आल्याने आम्ही तयारी सुरू केली आहे. यासाठी सजावट , विद्युत रोषणाई आदी कामे पुर्णत्वाकडे आहे. कोरोना महामारीचे संकट विसरून आता चांगल्या कमाईची आशा आहे. 
- हरिभाऊ तारो , हाॅटेल व्यावसायिक करमाड

दरम्यान, बहुतांश जण थर्टी फस्ट हाॅटेल्स व धाब्यावर साजरा करत असल्याने या व्यवसायास एकप्रकारे नवसंजीवनी मिळणार आहे. तथापि, शहरासह ग्रामीण भागातही रात्री दहानंतर संचारबंदी असल्याने यावर्षी थर्टी फस्टचा या व्यवसायावर काय परिणाम होईल हे पाहणे आता औचित्याचे ठरणार आहे.

मात्र, यावर्षी थर्टी फस्ट सोबत ग्रामपंचायतीच्या निवडणुका आल्या आहेत. सध्यस्थितीत यासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. त्यामुळे एकप्रकारे अप्रत्यक्षरित्या प्रचारास सुरूवातही झाली. त्यामुळे प्रचार करणार्‍या कार्यकर्त्यांची बडदास्त ठेवण्यासाठी खाणे-पिणे आवश्यक असल्याने हाॅटेल्स व धाब्यांची आवश्यकता असते. त्यामुळे या व्यवसायांसाठी हा काळ पर्वणीच म्हणावा लागेल.


थर्टी फस्ट सोबत ग्रापंचायतीचा महासंग्राम आल्याने डबघाईस आलेल्या आमच्या व्यवसायास थोडाफार तरी आधार मिळेल. यातुन बिघडलेले आर्थिक गणित पुन्हा जुळते का ते येणार्‍या काही दिवसांत कळेलच.
-  नारायण सादरे , धाबाचालक, 
(गाढेजळगाव ता.औरंगाबाद)

(edited by- pramod sarawale) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com