तीन वेगवेगळ्या घटनेने औरंगाबाद जिल्हा हादरला, झाले असे...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 2 June 2020

खंडाळा (ता. पैठण) येथे मंगळवारी (ता. दोन) दुपारी दोनच्या सुमारास गट नंबर ५३ सालवडगाव शिवारामधील शेततळ्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला तर खिर्डी (ता. खुलताबाद) येथील दीपक बाबासाहेब वैद्य (वय १९) याचा शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

औरंगाबाद : जिल्ह्यातील म्हैसमाळ येथे पतीने झोपेतच पत्नीचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. खंडाळा (ता. पैठण) येथे मंगळवारी (ता. दोन) दुपारी दोनच्या सुमारास गट नंबर ५३ सालवडगाव शिवारामधील शेततळ्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला तर खिर्डी (ता. खुलताबाद) येथील दीपक बाबासाहेब वैद्य (वय १९) याचा शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला या घटना मंगळवारी (ता. दोन) घडल्या. त्यामुळे जिल्हा हादरून गेला
 

कुऱ्हाडीचे वार करून पत्नीचा खून 

खुलताबाद - म्हैसमाळ (ता. खुलताबाद) येथील विश्रामगृह परिसरात मंगळवारी (ता. दोन) पहाटे पतीने पत्नीवर कुऱ्हाडी घाव घालीत खून केला. त्यामुळे खळबळ उडाली आहे. माया लहू साळवे असे मृताचे नाव असून, संशयितांनी घटनास्थळावरून पळ काढला. 

मृताचे वडील सुभाष तुपे यांनी दिली त्या तक्रारीनुसार, माया ही पती आणि मुलासह म्हैसमाळ येथे माहेरी राहत होती. मंगळवारी पहाटे  मायाचे आई-वडील हे काविळीचे औषध घेण्यासाठी जवळच असलेल्या लामणगाव येथे गेले होते. त्यावेळी माया घरातच झोपलेली होती. हीच संधी साधून तिचा पती लहू साळवे याने माया हिच्या गळ्यावर कुऱ्हाडीचेही वार करून तिचा खून केला. दरम्यान, मुलाने तत्काळ आजी-आजोबांना कॉल करून घटनेची माहिती दिली. ते लामणगावहून येईपर्यंत लहूने घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी लहूविरुद्ध खुलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. 
 

खंडाळा येथे युवकाचा बुडून मृत्यू 

विहामांडवा - खंडाळा (ता. पैठण) येथे मंगळवारी (ता. दोन) दुपारी दोनच्या सुमारास गट नंबर ५३ सालवडगाव शिवारामधील शेततळ्यात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. कृष्णा नारायण आरगडे (वय २०) असे मृताचे नाव आहे. 

कृष्णा हा मुलांना पोहणे शिकवत होता. दरम्यान, तो बुडाला. बरा वेळ होऊनही तो बाहेर आला नसल्याने तळ्या बाहेर असलेल्या मुलांना आरडा-ओरड केली. बाजूच्या शेतामध्ये असलेले राजेंद्र कल्याण आरगडे यांनी परिसरातील नागरिकांनी बोलावून कृष्णाला बाहेर काढले. त्याला पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. सौदागर यांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक गोरक्ष खरड करत आहे. 

सावधान!! कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे

शॉक लागल्याने युवकाचा मृत्यू 

खुलताबाद - खिर्डी (ता. खुलताबाद) येथील दीपक बाबासाहेब वैद्य (वय १९) याचा शेतात तुटून पडलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाला. यात त्याला विजेचा धक्का बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता. दोन) सकाळी सातच्या दरम्यान घडली. 
खिर्डी येथील गट नंबर २२९ मधील शेतात अनेक दिवसांपासून विजेच्या तारा लोंबकळत आहेत. याबाबत महावितरणला वेळोवेळी माहिती देऊनसुद्धा याकडे दुर्लक्ष होत होते. दरम्यान, सोमवारी रात्री या शिवारातील विद्युत तार तुटून पडली. या तारेला स्पर्श झाल्याने दीपकचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून, महावितरणप्रति रोष व्यक्त केला जात आहे. 

शेतकऱ्यांनो...निंबोळी अर्क तयार करण्याची हीच खरी वेळ, विनाखर्च बनविण्याची ही आहे पद्धत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three killed in Aurangabad district