esakal | तब्बल तीन लाख ३७ हजार कोरोना चाचण्या, दोन लाख ७७ हजार जण निघाले निगेटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

20coronavirus_105_0

कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी महापालिकेने ॲन्टीजेन व आरटीपीसीआर पद्धतीच्या चाचण्यांचा धडाका सुरू केला होता.

तब्बल तीन लाख ३७ हजार कोरोना चाचण्या, दोन लाख ७७ हजार जण निघाले निगेटिव्ह

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी महापालिकेने ॲन्टीजेन व आरटीपीसीआर पद्धतीच्या चाचण्यांचा धडाका सुरू केला होता. गेल्या नऊ महिन्यात शहरात तीन लाख ३७ हजार ८८० जणांच्या चाचण्या करण्यात आल्या असून, यातील ३१ हजार ५४ अहवाल पॉझिटिव्ह आले तर दोन लाख ७७ हजार ३८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे महापालिकेच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर शहरात मार्च महिन्यात पहिला रुग्ण आढळून आला.

त्यानंतर अवघ्या काही दिवसात म्हणजेच लॉकडाऊन असताना देखील एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट या महिन्यात संपूर्ण शहराला कोरोनाचा विळखा पडला. दररोज तब्बल ३०० ते ४०० रूग्ण आढळून येत असल्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली होती. कोरोनाचा मृत्युदरही जास्त होता. त्यामुळे केंद्रीय पथकाने शहरात धाव घेऊन चाचण्या वाढविण्यासह उपाय-योजना करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान तातडीने अहवाल मिळणाऱ्या ॲन्टीजेन पद्धतीच्या चाचण्या उपलब्ध झाल्या.

त्यामुळे महापालिकेने पहिल्यात टप्प्यात एक लाख ॲन्टीजेन कीट खरेदी करून चाचण्यांचा धडाका सुरू केला. आत्तापर्यंत शहरात तीन लाख ३७ हजार ८८० कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून, यातील ३१ हजार ५४ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह निघाले. तब्बल दोन लाख ७७ हजार ३८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचे महापालिकेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

६७४ जणांवर उपचार
दसरा, दिवाळीमुळे बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी वाढल्यानंतर काही काळ कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. मात्र पुन्हा एकदा रुग्णसंख्या ५० च्या खाली आली आहे. सध्या घाटी, जिल्हा सामान्य रूग्ण, चिकलठाणा कोविड सेंटर, महापालिकेचे कोविड सेंटर्स व खासगी रूग्णालयात ६७४ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यातील ६५० रूग्ण शहरातील रहिवासी आहेत तर ११ रूग्ण जण ग्रामीण भागातील असून, १३ रूग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत.
 

Edited - Ganesh Pitekar