मराठवाड्यात साडेतीन हजार कोटींचे पीककर्ज वाटप

प्रकाश बनकर
Wednesday, 15 July 2020

खरीप हंगामासाठी मराठवाड्यात सर्व सहकारी, खासगी व ग्रामीण बँकांतर्फे कर्जवाटप प्रक्रिया नियमित सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पीककर्ज वाटप प्रक्रियेमध्ये दोन हजार ६३८ नवीन सभासदांना १६ कोटी २४ लाख ६३ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.

औरंगाबाद : सध्या खरीप हंगामासाठीचे पीककर्ज वाटप प्रक्रिया जलद गतीने सुरू आहे. सोमवारपर्यंत (ता.१३) मराठवाड्यात तीन हजार ५०३ कोटी ३१ लाख ४१ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक ५७५ कोटी ४९ लाख ८४ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी  दिली. 

खरीप हंगामासाठी मराठवाड्यात सर्व सहकारी, खासगी व ग्रामीण बँकांतर्फे कर्जवाटप प्रक्रिया नियमित सुरू आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पीककर्ज वाटप प्रक्रियेमध्ये दोन हजार ६३८ नवीन सभासदांना १६ कोटी २४ लाख ६३ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.

हेही वाचादिलासा... जनता कर्फ्यूतही चारशेहून अधिक कंपन्या राहणार सुरू   

तर गेल्या वर्षी या तारखेला ३६ हजार ७४० सभासदांना १११ कोटी १८ लाख ३६ हजारांचे कर्जवाटप करण्यात आले होते. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभ मिळालेल्या जिल्हा बँक, व्यापारी बँक आणि ग्रामीण बँकेच्या ३७ हजार २०६ सभासदांना १२४ कोटी ४६ लाख ७६ हजार रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे, अशी माहितीही श्री. दाबशेडे यांनी दिली. 

हेही वाचा- बाजार समित्यांच्या निवडणुका सहा महिने पुढे ढकलल्या  

 

जिल्हा सभासद कर्जवाटप(रक्कम लाखात) टक्‍केवारी
औरंगाबाद ११८४९५ ५७५४९.८४ ४८.०९ 
जालना ७६९५५ ३७८४३.३६ ३३.९३ 
परभणी ६३०७६ ३०३८३.६२ १९.३९
हिंगोली ४११९७ २२२५६.०४ १९.०४ 
लातूर १९५९९० ९३३६५.४६ ४०.८८
उस्मानाबाद ७४८६६ ४४५९७.०० २८.०४ 
बीड ४६२८६ ३०५१९.०० ३२.१३
नांदेड ६५०१३ ३४८११.२९ १७.१३

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Thausand Five Hundread Crores Crop Loan Distributed In Marathwada Region