esakal | Grampanchayat Elections : ग्रामपंचायतसाठी आज माघारीचा शेवटचा दिवस, उमेदवारांना चिन्ह वाटप होणार
sakal

बोलून बातमी शोधा

3gram_20panchayat_20election_5

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी (ता.४) अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस असून मैदानात राहिलेल्या उमेदवारांना दुपारी तीननंतर चिन्ह वाटप केले जाणार आहे.

Grampanchayat Elections : ग्रामपंचायतसाठी आज माघारीचा शेवटचा दिवस, उमेदवारांना चिन्ह वाटप होणार

sakal_logo
By
शेखलाल शेख

औरंगाबाद : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी (ता.४) अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस असून मैदानात राहिलेल्या उमेदवारांना दुपारी तीननंतर चिन्ह वाटप केले जाणार आहे. चिन्ह मिळताच ग्रामपंचायतीसाठी खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरवात होणार आहे.
जिल्ह्यात ६१७ ग्रामपंचायतींच्‍या निवडणुकीसाठी छाननीअंती १६ हजार ९४२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. आत अर्ज मागे घेण्यासाठी अंतिम दिवस असल्याने अनेकांनी फिल्डींग लावून उमेदवारांच्या माघारीसाठी प्रयत्न केले.

सोमवारी दुपारी तीन नंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची अंतिम चित्र स्पष्ट होईल. जिल्ह्यात वैजापूर २६४९, सिल्लोड २३१९, कन्नड २०४३, पैठण २४५४, औरंगाबाद २१८१, गंगापूर २२२६, फुलंब्री १४४८, सोयगाव ९५३ तर खुलताबाद तालुक्यातील ६६९ उमदेवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात १२ लाख ४६ हजार ५३६ मतदार मतदान करतील. १५ जानेवारीला मतदान होईल. जिल्ह्यातील ६१७ ग्रामपंचायतींमध्ये २०९० प्रभागांसाठी ५,६८३ सदस्यसंख्या राहणार आहे.

Edited - Ganesh Pitekar