आजपासून औरंगाबाद शहरात ११ वी, १२ वीच्या वर्गांना परवानगी

माधव इतबारे
Tuesday, 15 December 2020

औरंगाबाद शहरात ९ वी ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास तीन डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. मात्र काही दिवसांपासून कोरोना संसर्ग कमी होत असल्याने मंगळवारपासून (ता. १५) ११ वी व १२ वीचे वर्ग सुरू करण्यास महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी परवानगी दिली आहे.

औरंगाबाद  : शहरात ९ वी ते १२ पर्यंतचे वर्ग सुरू करण्यास तीन डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आलेली आहे. मात्र काही दिवसांपासून कोरोना संसर्ग कमी होत असल्याने मंगळवारपासून (ता. १५) ११ वी व १२ वीचे वर्ग सुरू करण्यास महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी परवानगी दिली आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक, कर्मचाऱ्यांना आरटीपीसीआर पद्धतीच्या चाचण्या बंधनकारक करण्यात आल्या आहेत. मिशन बिगेन अगेन अंतर्गत जिल्ह्यातील शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.

मात्र शहरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने प्रशासक श्री. पांडेय यांनी तीन जानेवारीपर्यंत वर्ग भरविण्यास परवानगी दिली नव्हती. दरम्यान सोमवारी (ता. १४) यासंदर्भात आदेश काढण्यात आले आहेत. त्यात ११ वी १२ वीचे वर्ग मंगळवारपासून सुरू करण्यात परवानगी देण्यात आली आहे. शाळा सुरू करण्यापूर्वी शिक्षक-कर्मचाऱ्यांना चाचणी करणे आवश्‍यक आहे. तसेच पालकांकडून संमतिपत्र घेण्यात यावेत. कोरोनासंदर्भातील शासन आदेशाचे पालन करण्यात यावे. ज्या विद्यार्थाने ऑनलाइन पद्धतीचा पर्याय निवडला असेल, त्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात यावे. आदेशाचे पालन न करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From Today Permission For Eleven, Twelfth Classes In Aurangabad