आता शेतकऱ्यांना रोज घडणार शिवरायांचे दर्शन, पहा ते कसे?

Twelve Foot Statue Of Shivaji Maharaj to be installed In Aurangabad APMC Marathi News
Twelve Foot Statue Of Shivaji Maharaj to be installed In Aurangabad APMC Marathi News

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील नवीन मुख्य रस्त्यावर छत्रपती शिवरायांचा भव्य असा पाच टनांचा, साडेबारा फूट उंचीचा पुतळा बसविण्यात येणार आहे. चबुतऱ्याचे काम अंतिम टप्प्यात असून ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येईल, अशी माहिती सभापती राधाकिसन पठाडे यांनी सोमवारी (ता. १३) दिली.

 बाजार समितीमधील फूल मार्केटच्या बाजूने जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर हा पुतळा बसविण्यात येणार आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजार समिती असून येथे अनेक वर्षांपासून शिवरायांचा पुतळा बसविण्याची मागणी होती. बाजार समितीच्या विकासकामांमध्ये हा पुतळा बसविण्याचा ठराव संचालक मंडळाने घेतला.

त्यानुसार वर्षभरापासून कामही सुरू झाले. पुतळा भव्यदिव्य असावा यासाठी नाशिक येथील शिल्पकाराला काम देण्यात आले होते. अश्‍वारूढ पुतळ्याचे कामही पूर्ण झाले आहे. या सर्व प्रक्रियेसाठी १ कोटी ७ लाख रुपयांपर्यंत खर्च येणार आहे, असेही सभापती पठाडे यांनी सांगितले. 

असा असेल भव्यदिव्य पुतळा 

  •  पंचधातूपासून निर्मिती 
  •  तब्बल पाच टन वजन 
  •  साडेबारा फूट उंची 
  •  साडेतेरा फुटांचा चबुतरा 
  • १ कोटी ७ लाख रुपये खर्च

छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा तयार झाला आहे. यासाठी पूर्वी कला संचालनालयाची व आता सहकार विभागाची परवानगी मिळाली आहे. स्थानिक प्रशासनाची परवानगी मिळाल्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येईल. 
- राधाकिसन पठाडे, सभापती, बाजार समिती. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com