esakal | COVID-19 : पैठण तालुक्यात दुसरा रुग्ण, पारुंडी गावातील तरुणीला बाधा
sakal

बोलून बातमी शोधा

Two corona patients in Paithan Taluka

तरुणीचे मूळ गाव पारुंडी आहे. तिचे वडील आई-वडील कामानिमित्त औरंगाबाद शहरात राहतात. लॉकडाउन सुरू झाल्याने हे कुटुंब पारुंडी येथे वास्तव्यास आले.

COVID-19 : पैठण तालुक्यात दुसरा रुग्ण, पारुंडी गावातील तरुणीला बाधा

sakal_logo
By
शेख मुनाफ

आडूळ (जि. औरंगाबाद) - रुग्णालयात उपचार घेत असलेल्या १८ वर्षीय तरुणीच्या कोविड-१९ चाचणीचा पॉझिटिव्ह आल्याने पारुंडी (ता. पैठण) गावात खळबळ उडाली आहे. पैठण तालुक्यातील हा दुसरा रुग्ण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने संपूर्ण गावात निर्जुंकीकरण केले. 

तरुणीचे मूळ गाव पारुंडी आहे. तिचे वडील आई-वडील कामानिमित्त औरंगाबाद शहरात राहतात. लॉकडाउन सुरू झाल्याने हे कुटुंब पारुंडी येथे वास्तव्यास आले. पाच दिवसांपूर्वी तरुणी आजारी पडल्याने तिच्यावर औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, तिच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तिच्या आई-वडिलांच्या संपर्कात आलेल्या गावातील सात जणांना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर तिच्या कुटुंबातील पाच जणांना शहरात क्वांरटाईन करण्यात आले आहे. 
 
पाचोड पोलिसांनी दिली भेट
पाचोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक अतुल येरमे, पोलिस उपनिरिक्षक युवराज शिंदे, तात्यासाहेब गोपालघरे यांनी मंगळवारी (ता. २६) सांयकाळी गावात भेट देऊन ग्रामस्थांना घराबाहेर न निघण्याचे अवाहन केले. बाधित तरुणीच्या आई-वडिलांच्या संपर्कात आलेल्या गावातील सात जणांना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तर तिच्या कुटुंबातील पाच जणांना शहरात क्वांरटाईन करण्यात आले आहे. दरम्यान, महसूल व आरोग्य विभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी गावात फिरकला नाही. गावात फक्त ग्राम सेवक हजर होता.

घाबरू नका, तब्बल नव्वद टक्के रुग्ण ठणठणीत बरे होणार

तिघांना घाटीतून सुटी 
तीन पॉझिटिव्ह रुग्णांना आयसीएमआरच्या नियमावलीप्रमाणे सुटी देण्यात आली. ब्राह्मण गल्ली बेगमपुरा येथील ३६ वर्षीय पुरुष, गणेशनगर, सातारा परिसर येथील ५० वर्षीय पुरुष, मकसूद कॉलनी, चंपाचौक येथील ६५ वर्षीय महिलेचा सुटी दिलेल्यात समावेश आहे. 
  

ही तरुणी व तिचे कुटुंबीय गावाबाहेर शेतात पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. त्यामुळे थेट तिचा संपर्क फक्त तिच्या कुटुबीयांसोबत होता. तिच्या कुटुंबीयांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले आहेत. तिच्या कुटुंबीयांच्या संपर्कात आलेले सात जण क्वांरटाईन करण्यात आले आहेत. 
- विजयकुमार वाघ, तालुका वैद्यकिय अधिकारी 
 

चोवीस तासांतील अपडेट 
 
घाटी रुग्णालय, औरंगाबाद  

  • शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चोवीस तासांत ६० जणांची तपासणी 
  • त्यापैकी ३८ रुग्णांच्या लाळेचे नमुने घेण्यात आले. 
  • चार रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह, तिघांचा अहवाल निगेटिव्ह, ३१ रुग्णांच्या अहवालाची प्रतीक्षा. 
  • जिल्हा रुग्णालयातून तीन पॉझिटिव्ह रुग्णांना घाटी रुग्णालयात भरती करण्यात आले.