कन्नडमध्ये १८ जण कोरोनामुक्त, फुलंब्री तालुक्यात दुसरा बळी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

 फुलंब्रीत एका बँक कर्मचाऱ्यालाही कोरोनाची बाधा

औरंगाबाद - जिल्ह्यातील ग्रामीण भागाही कोरोनाची रुग्ण संख्या वाढत आहे. आज (ता. ३०) फुलंब्री तालुक्यात कोरोना आणि इतर आजाराने दोघांचा बळी गेला तर कन्नडमध्ये १८ जण कोरोनामुक्त झाले. दरम्यान, सिल्लोड तालुक्यात नवे दोन रुग्ण आढळले.

फुलंब्री तालुक्यातील खामगाव येथील एका ट्रक चालकाचा कोरोना व इतर आजारामुळे मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ आता फुलंब्री शहरातील पहिला कोरोना रुग्णही उपचारादरम्यान मंगळवारी (ता. ३०) दगावला. दरम्यान, येथील एका बँकेतील महिला कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रसन्ना भाले यांनी दिली. 
शहरामध्ये मंगळवारी एका ६२ वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटी हॉस्पिटलमध्ये उपचार दरम्यान मृत्यू झाला. बाधित बॅंकर महिलेच्या अती संपर्कातील १६ व्यक्तीचे स्वॅब घेण्यात आले आहे.

दरम्यान, संबंधित बँक तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्या आदेशानुसार पुढील दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. शिवाय बॅंकेचे निर्जुंकीकरण करण्यात आले. तालुक्यात आतापर्यंत एकूण १७ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यापैकी १० रुग्ण बरे झाले आहेत. दोघांचा मृत्यू झाला तर पाच जणांवर उपचार सुरू आहेत. 
 
कन्नडमध्ये १८ जण कोरोनामुक्त 
कन्नड -
 देवळणा येथे कोरोनाचा १७ मे रोजी तालुक्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. तालुक्यात आता एकूण ४० रुग्ण आढळले. त्यापैकी १८ जण बरे झाले. १४ जणांवर उपचार सुरू आहेत. दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शिवाय एका रुग्णावर नाशिक येथे हे उपचार सुरू असून, चार रुग्णांना औरंगाबाद येथे रेफर करण्यात आले आहे, अशी माहिती उपविभागीय
अधिकारी जनार्धन विधाते यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री. विधाते म्हणाले, तालुक्यातील कोरोनाची साथ पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश मिळालेले आहे. तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे असलेल्या कोविड सेंटरमध्ये रुग्ण बरे होण्याची संख्या ही शंभर टक्के आहे. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश सातव, मुख्याधिकारी नंदा गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. लांजेवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता देगावकर, डॉ. प्रवीण पवार, नायब तहसीलदार हरून शेख, पोलिस निरीक्षक रामेश्वर रेंगे, ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुनील नेवसे उपस्थित होते. 
  
सिल्लोड तालुक्यात नवे दोन रुग्ण 
सिल्लोड -
 शहरासह तालुक्यातील बोरगाव कासारी येथे मंगळवारी (ता. ३०) प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आढळले. दोघांवरही औरंगाबाद येथे उपचार आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित सरदेसाई व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रेखा भंडारे यांनी दिली. शहरातील जमालशा कॉलनी परिसरातील ४७ वर्षीय व्यक्ती तर बोरगाव कासारी येथील २७ वर्षीय
तरुणाचाच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

Tiktok वर होतं मोदी सरकारचं अकाउंट; बंदीनंतर काय झालं?
 
विना मास्क फिरणाऱ्यांचे गांधीगिरीने स्वागत 

वैजापूर - विनामास्क बाहेर फिरणाऱ्यांमुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. त्यामुळे जनजागृती करण्यासाठी विना मास्क फिरणाऱ्यांचे भारतीय जैन संघटनेतर्फे गांधीगिरीने मंगळवारी (ता. ३०) स्वागत करण्यात आले. यावेळी भारतीय जैन संघटनेचे मराठवाडा विभाग सचिव निनीलेश पारख, नंदलाल मुगदिया, प्रफुल संचेती, संतोष बोथरा, प्रवीण कोतकर, नगरसेवक गणेश
खैरे, रूपेश कुचेरिया, ऋषभ पारख, नगरपालिकेचे मिलिंद साळवे, वाल्मीक वाणी आदी उपस्थित होते. 

चिनी ऍपला पर्याय भारतीय अप्लिकेशन्स; रोपोसो, मित्रो आणि चिंगारीला पसंती
 
वैजापूर येथे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा 
वैजापूर -
 जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी मंगळवारी पंचायत समितीच्या सभागृहात आढावा बैठक घेतली. करोना रुग्णांच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त संशयितांचे स्वॅब घेऊन प्रभावीपणे उपाययोजान करा असे आदेश त्यांनी दिले. 

त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, आमदार रमेश बोरनारे, उपविभागीय अधिकारी डॉ. संदिपान सानप, उपनगराध्यक्ष साबेरखान, माजी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, जिल्हा परिषद सदस्य अविनाश गलांडे, नायब तहसीलदार महेंद्र गिरगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गजानन टारपे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two corona patients in Sillod