esakal | CoronaUpdate: औरंगाबादेत आणखी दोन मृत्यू, भुसावळच्या रुग्णाचा समावेश, आज ४७ रुग्ण पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

CoronaVirus

औरंगाबाद शहरातील सिडको एन -४ येथील ७४ वर्षीय पुरुष आणि भुसावळ (जि. जळगाव) येथील ४९ वर्षीय महिलेचा कोरोना व इतर व्याधींनी मृत्यू झाला. आज (ता.तीन) सकाळी ४७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६९६ झाली आहे.

CoronaUpdate: औरंगाबादेत आणखी दोन मृत्यू, भुसावळच्या रुग्णाचा समावेश, आज ४७ रुग्ण पॉझिटिव्ह

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : शहरातील सिडको एन -४ येथील ७४ वर्षीय पुरुष आणि भुसावळ (जि. जळगाव) येथील ४९ वर्षीय महिलेचा कोरोना व इतर व्याधींनी मृत्यू झाला. आज (ता.तीन) सकाळी ४७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६९६ झाली आहे. यापैकी १०८५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ८५ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता ५२६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा- सावधान..! ‘आर्सेनिक अल्बम-३० गोळ्यांचाही काळाबाजार

८५ वा मृत्यू
सिडको एन -४ येथील ७४ वर्षीय पुरूष रुग्णाला १८ मे रोजी खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल २७ मे रोजी पॉझिटिव्ह आला. त्यांचा आज सकाळी साडेसहा वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.

भुसावळ येथील महिलेचा मृत्यू
भुसावळ (जि. जळगाव ) येथील ४९ वर्षीय महिलेला ३१ मे रोजी खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. १ जूनला त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल  पॉझिटिव्ह आला. त्यांचा मंगळवारी (ता. दोन )  सायंकाळी पाचच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला.

क्लिक करा- दोघांचाही छत्तीसचा आकडा होता, अन एक दिवस संधी साधलीच.....

आज आढळलेले रुग्ण -(कंसात रुग्ण संख्या)
जसवंतपुरा (१), संजय नगर, मुकुंदवाडी (१), खोकडपुरा (२), अजिंक्य नगर (१), समता नगर (२), समृद्धी नगर, एन-४ सिडको (१), जय भवानी नगर (१), लेबर कॉलनी (२), मिल कॉर्नर (४), हमालवाडी, रेल्वे स्टेशन (१), भावसिंपुरा (२), शिवशंकर कॉलनी (५), पिसादेवी रोड (१), कटकट गेट (१),

सिल्लेखाना नूतन कॉलनी (१), बारी कॉलनी (१),उल्का नगरी (१),एन-सहा, संभाजी कॉलनी, सिडको (१),शरीफ कॉलनी (१),कैलास नगर (४), स्वप्न नगरी, गारखेडा परिसर (१), भवानी नगर, जुना मोंढा (१), पुंडलिक नगर रोड, गारखेडा (१), विद्यानिकेतन कॉलनी (१), सुराणा नगर (२), अन्य (३) आणि यशवंत नगर, पैठण (३), अब्दुलशहा नगर, सिल्लोड (१) या भागातील कोरानाबाधित आहेत. यामध्ये २१ महिला आणि २६ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.

हेही वाचा- Covid-19 : बाळंतपणासाठी गेली अन् कोरोनाबाधा झाली!

आतापर्यंत ८५ मृत्यू
घाटी रुग्णालयात ६८,  तीन विविध खासगी रुग्णालयांमध्ये एकूण १६, जिल्हा रुग्णालयात ०१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात एकूण ८५ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. भुसावळ (जि.  जळगाव ) येथील महिलेचा मृत्यू औरंगाबादच्या मृत्युसंख्येत समाविष्ट करण्यात आलेला नाही.

असा आहे कोरोना मीटर
उपचार घेणारे रुग्ण - ५२६
बरे झालेले रुग्ण      - १०८५
एकूण मृत्यू            - ८५
एकूण रुग्णसंख्या  - १६९६

हे वाचलंत का?- निरोपाआधीच घेतला आरोग्ययोद्ध्याने ‘निरोप’, दंत महाविद्यालयाच्या चालकाची एक्झिटने चटका