नागपूर-मुंबई महामार्गावर खडक नारळा शिवारात दोन कावळे मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ; बर्ड फ्लूचा धोका

अविनाश संगेकर
Saturday, 16 January 2021

या ठिकाणाहून पुढे एखादा किमी अंतर गेले आणि आरापूर शिवारातील वळणावर आणखी एक कावळा महामार्गावर मृत अवस्थेत दिसला. अवघ्या काही अंतरात दोन कावळे मृत आढळल्याने अन्नदाते यांच्या मनात सध्या सुरू असलेल्या बर्ड फ्लूच्या शंकेची पाल चुकचुकली.

लासुर स्टेशन (औरंगाबाद) : लासुर स्टेशन (ता.गंगापूर) ते औरंगाबाद दरम्यान शनिवारी सकाळी नऊच्या सुमारास नागपूर-मुंबई महामार्गावर सुलतानाबाद व आरापूर शिवारात दोन कावळे मृत अवस्थेत आढळून आले.

औरंगाबादच्या बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

लासुर स्टेशन येथील फार्मासिस्ट संदेश अन्नदाते हे सकाळी नऊच्या सुमारास मुंबई महामार्गावरून औरंगाबादला दुचाकीवरून जात असताना त्यांना सुलतानाबादच्या अलीकडील वळणावर एक कावळा महामार्गावर मृत अवस्थेत दिसला. पण एखाद्या वाहनाच्या धडकेने हा कावळा मृत पावला असावा, या विचाराने त्यांनी दुर्लक्ष केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या ठिकाणाहून पुढे एखादा किमी अंतर गेले आणि आरापूर शिवारातील वळणावर आणखी एक कावळा महामार्गावर मृत अवस्थेत दिसला. अवघ्या काही अंतरात दोन कावळे मृत आढळल्याने अन्नदाते यांच्या मनात सध्या सुरू असलेल्या बर्ड फ्लूच्या शंकेची पाल चुकचुकली. अन्नदाते यांनी आमच्या सकाळ बातमीदारास मोबाईलवरून संपर्क साधला व या दोन्ही मृत कावळ्यांची छायाचित्रे पाठवून घटनास्थळ व माहिती सांगितली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two crows have been found dead on Khadak Narla Shivara on Nagpur Mumbai highway