esakal | औरंगाबादने ओलांडली पन्नाशी, आता 51 कोरोना पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

Aurangabad News

आजही पहाटे आसेफिया कॉलनीतील 35 वर्षीय महिला आणि समतानगर येथील 65 वर्षीय वृद्धेला कोवीड -19 विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. त्यांचे अहवाल रविवारी (ता. 26) पहाटे आले आहेत. 

औरंगाबादने ओलांडली पन्नाशी, आता 51 कोरोना पॉझिटिव्ह

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : कोरोना विषाणू आणि त्यापासून होणाऱ्या कोविड-१९ या आजाराचा धोका औरंगाबाद शहरात वाढत आहे. आजही पहाटे आसेफिया कॉलनीतील 35 वर्षीय महिला आणि समतानगर येथील 65 वर्षीय वृद्धेला कोवीड -19 विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाचे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली. त्यांचे अहवाल रविवारी (ता. 26) पहाटे आले आहेत. 

शहरातील मृत्युदर : 9.80 टक्के 
बरे होणाऱ्यांचे प्रमाण : 43.13 टक्के 

शहरात १५ मार्चला पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला होता. परदेशातून आलेल्या एका महिलेला संसर्ग झाला. त्यानंतर तब्बल १५ दिवस शहरात नवा रुग्ण आढळला नाही. त्यामुळे शहरवासीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला; पण दोन एप्रिलला एन- चारमधील एका महिलेला बाधा झाली आणि त्यानंतर आजपर्यंत (ता. २६) तब्बल 51 व्यक्ती कोरोनाग्रस्त झाल्या. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

आतापर्यंत झालेले मृत्यू 

  • ५ एप्रिल सातारा परिसरातील ५८ वर्षीय बँक व्यवस्थापकाचा मृत्यू 
  • १४ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू 
  • १८ एप्रिलला बिस्मिल्ला कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • २१ एप्रिलला भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • २२ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा