
पोलिसांनी मोठया शिताफीने आरोपींना गजाआड केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे
पाचोड (जि.औरंगाबाद): दिवसभराचे काम उरकून आपल्या शेतवस्तीवरील घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीस फोन करून नातेवाईक असल्याची बतावणी करून झोपेतून उठवून त्याने ओरडू नये म्हणून त्याचे तोंड दाबून बाहेर नेऊन तिच्यावर रविवारी (ता. ६) रात्री अकरा वाजता जबरदस्तीने बलात्कार केला होता. त्यानंतर फरार झालेल्या थेरगाव (ता.पैठण) येथील दोन नराधम युवकांना अथक परिश्रमानंतर पाचोड (ता. पैठण) पोलिसांनी बुधवारी (ता.९) गजाआड केले आहे. या दोघांविरुद्ध सोमवारी ( ता. ७) बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.
यासंबंधीची अधिक माहिती अशी, थेरगाव येथील इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेणारी पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलगी शाळा बंद असल्याने आई-वडिलांसोबत दिवसभराची कामे उरकून सायंकाळी आपल्या घरात झोपी गेली. तोच गावातील जुनेद दस्तगीर पठाण व दीपक माणिक आहेर हे दोघे युवक रात्री अकरा वाजेच्या सुमारास शेतातील पिडित महीलेच्या शेतवस्तीवर आले व त्यांनी वडिलांच्या मोबाइलवर कॉल करून नातेवाईक असल्याची बतावणी करून दरवाजा उघडण्यास सांगितले. मुलीने दरवाजा उघडताच आई - वडिलांपासून बाजुला झोपलेल्या त्या मुलीचे तोंड दाबुन ओरडू नये म्हणून त्याचा आवाज बंद केला. त्यानंतर त्या दोघा नराधमानी तिला घराच्या पाठीमागे तुरीच्या पिकात नेऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. घाबरलेल्या त्या मुलीने सकाळी तिच्या सोबत रात्रीला घडलेला सर्व प्रकार तिच्या आई-वडील, आजी -आजोबा व आत्या यांना सांगितला.
ही माहिती समजताच संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी मुलीला घेऊन पाचोड पोलिस ठाणे गाठून उपरोक्त घडलेला प्रकार पोलीसांना सांगितला. पोलिसांनी पिडित मुलीचा इन कॅमेरा जबाब नोंदवून तिची वैद्यकिय तपासणी करण्यासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात पाठविले.अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोघा तरुणांविरुद्ध पाचोड पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवला. पाचोडचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल येरमे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाचा पंचनामा करून तातडीने आरोपींना जेरबंद करण्यासाठी तपासाची चक्रे फिरवली.
डेप्युटी सीईओंची भटकंती थांबली, सदस्यांनी सोडवला दालनाचा प्रश्न
आरोपींना या गोष्टीची भनक लागताच त्यांनी गावातून पोबारा केला. यासंबंधी सहाय्यक पोलिस अधिक्षक गोरख भामरे, पाचोडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे, पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, गोरख कणसे, नरेंद्र अंधारे, भगवान धांडे , हनुमान धनवे आदींनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीच्या शोधार्थ परिसर पिंजून काढला. गावात कोणत्याही प्रकारे तेढ निर्माण होऊ नये म्हणून गावांत पोलिसाचे पथक तैनात करण्यात आले होते. सहाय्यक पोलीस अधीक्षक भामरे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपींना जेरबंद करण्याकरीता तीन पथके तयार करून ती आरोपींच्या मागावर तीन विभागात पाठविले होते.
आरोपी अटक करण्यासाठी पोलिसांनी सर्व परिसर पिंजून काढला, मात्र पोलिसांना ते गुंगारा देत होते.अखेर पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातुन सर्वत्र शोध घेतला. औरंगाबाद येथे नातेवाईकाकडे लपुन बसलेल्या जुनेद दस्तगीर पठाण व दीपक माणिक आहेर दोघे रा. थेरगाव (ता.पैठण)या दोघाना बुधवारी ( ता. नऊ) रात्री जेरबंद केले.
Corona Updates: औरंगाबाद जिल्ह्यात ६७ नवीन कोरोना रुग्ण
पोलिसांनी मोठया शिताफीने आरोपींना गजाआड केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, सहाय्यक पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे, पोलीस उपनिरीक्षक गोरक्ष खरड, गोरख कणसे, नरेंद्र अंधारे, भगवान धांडे , हनुमान धनवे आदी पुढील तपास करीत आहे.
(edited by- pramod sarawale)