दुचाकी-बसच्या धडकेत एक ठार, एक गंभीर; दाभरूळ गावाजवऴील घटना  

शेख मुनाफ 
Thursday, 19 November 2020

औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दाभरुळ येथील घटना 

आडूळ (औरंगाबाद) : भरधाव जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसने समोरून येणाऱ्या दुचाकीला चिरडल्याने एक दुचाकीस्वार जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास औरंगाबाद-बीड या राष्ट्रीय महामार्गावर दाभरुळ गावाजवळील उड्डाणपुलावर घडली.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
 
पाचोड पोलिसांनी सांगितले, की पैठण तालुक्यातील एकतुनी येथील वैजीनाथ बाबुराव चाळगे व शेख अफसर सत्तार हे दोघे विनानंबरच्या दुचाकीने आडगावहून (जावळे) एकतुनीकडे आपल्या घरी जात होते. दाभरुळ गावाजवळील उड्डाणपुलावरून जात असताना त्याच वेळेस औरंगाबादहुन लातूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या एसटी बसने (क्रं एम एच २० बी एल २३६५) त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

यात वैजीनाथ बाबुराव चाळगे (वय ३५) हा युवक जागीच ठार झाला. तर त्याच्या पाठीमागे दुचाकीवर बसलेले शेख अफसर सत्तार (वय ५५) हे गंभीररीत्या जखमी झाले. यात दुचाकीचाही चुराडा झाला. घटनेची माहिती पाचोड पोलिसांना कळताच रविंद्र क्षिरसागर, नाना पटेकर, नुसरत शेख, जीवन गुढेकर, विश्वजित धनवे आदींनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या शेख अफसर यांना पुढील उपचारासाठी पाचोड येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ही काही वेळ खोळंबली होती. अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: two wheeler bus accident one killed one serious injured Dabharul village