हाॅटेलमध्ये तलाठ्याची गळफास लावून आत्महत्या, औरंगाबाद जिल्ह्यातील धक्कादायक घटना

सचिन चोबे
Thursday, 17 December 2020

सिल्लोड  शहराबाहेरील वळण रस्त्यावर असलेल्या हॉटेलमध्ये तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

सिल्लोड  (जि.औरंगाबाद) : सिल्लोड  शहराबाहेरील वळण रस्त्यावर असलेल्या हॉटेल पूजा येथे तलाठ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार (ता.16) रोजी संध्याकाळी नऊ साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली.

 

कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधवांना जबर मारहाण, व्हिडिओ होतोय व्हायरल

मिळालेल्या माहितीनुसार देऊळगाव कमान (ता.भोकरदन) सजेवर कार्यरत असलेले तलाठी दिनेश माणिकलाल जैस्वाल (वय 43,, रा.सिल्लोड (जि.औरंगाबाद) यांनी शहरालगत असलेल्या पूजा हॉटेल येथील तिसऱ्या मजल्यावर गळफास घेत आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

 

Edited - Ganesh Pitekar
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Village Revenue Chief Committed Suicide Sillod Aurangabad News