esakal | माझ्यावर औरंगाबाद रेल्वेस्थानकात तिघांनी अत्याचार केला, अल्पवयीन मुलीची पोलिसांकडे तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

crime

उत्तर प्रदेशातील एका अल्पवयीन मुलीचे राजस्थानात लग्न लावण्यात आले. ही बाब तिच्या वडीलांकडूनही स्पष्ट करण्यात आली. ही मुलगी औरंगाबादेत आली.

माझ्यावर औरंगाबाद रेल्वेस्थानकात तिघांनी अत्याचार केला, अल्पवयीन मुलीची पोलिसांकडे तक्रार

sakal_logo
By
मनोज साखरे

औरंगाबाद : ‘‘माझ्यावर औरंगाबाद रेल्वेस्थानकात तिघांनी अत्याचार केला. त्यानंतर मी रेल्वेमार्गाने चिकलठाणा येथे आले,’’ असे अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितले, त्यानंतर तिनेच ‘माझ्यावर दुपारी अत्याचार झाला असे सांगितले. पुन्हा तिने एकानेच अत्याचार केला’ अशा तीन वेगवेगळ्या बाबी पोलिसांना तिने सांगितल्याने सुरुवातीला पोलिस चक्रावले पण त्यांनी या प्रकरणात मुलीची वैद्यकीय तपासणी करीत संशयितांचा शोध सुरु केला आहे.
उत्तर प्रदेशातील एका अल्पवयीन मुलीचे राजस्थानात लग्न लावण्यात आले. ही बाब तिच्या वडीलांकडूनही स्पष्ट करण्यात आली. ही मुलगी औरंगाबादेत आली.

जनता तुम्हाला माफ करणार नाही, इम्तियाज जलीलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

त्यानंतर तिने शनिवारी (ता. नऊ) पहाटे चारच्या सुमारास स्वतःवर अत्याचार झाल्याचे सांगितले. अत्याचारानंतर ती रेल्वेमार्गानेच चिकलठाण्यात आल्याचे ती सांगते. चिकलठाणा रेल्वेस्थानकात ती बसल्यानंतर तेथील व्यक्तींनी तिची विचारपूस केल्यानंतर तिने हा प्रकार सांगितला होता. त्यानंतर पोलिसांनीही तिला विचारणा केली. तेव्हा ती हेच म्हणाली. त्यामुळे पोलिसांनी तिला लगेचच घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले.

पीककर्ज वाटप घोटाळ्याप्रकरणी ऐन ग्रामपंचायतीच्या धामधूमीत गुन्हे दाखल; विरोधकांना फायदा

तत्पूर्वी पुन्हा तिची विचारपूस केली तेव्हा तिने स्वतःवर दुपारी अत्याचार झाल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा तिने एकाच व्यक्तीने अत्याचार केल्याचे सांगितले. या तीन वेगवेगळ्या सांगण्यामुळे पोलिसांनीही सावध भूमिका घेतली आहे. सध्या तिची घाटी रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली असून यात गुन्हा नोंदविला जाणार असेही सहायक आयुक्त विवेक सराफ यांनी सांगितले.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

ती जी जागा सांगते तिथे होते पोलिस!
पहाटे औरंगाबाद रेल्वेस्थानक परिसरात अत्याचार झाल्याचे ती सांगते. त्यावेळी तिथे दोन लोहमार्ग पोलिस कर्मचारी गस्तीवर होते. हे सीसीटीव्हीतही दिसते. त्यामुळे तिने जे स्थळ सांगितले ते नसावे इतरत्र तिच्यावर अत्याचार झाला असावा असाही पोलिसांचा अंदाज आहे.

संशयिताचा शोध सुरु
पोलिसांनी घटनेच्या अनुषंगाने खबरदारी घेतली आहे. त्यांनी मुलीने सांगितल्यानुसार संशयितांचा शोधही सुरु केला आहे. यासाठी पथकेही तयार केली असून तिने सांगितलेल्या स्थळाजवळ तसेच इतर ठिकाणी संशयितांचा शोधही घेतला जात आहे.

संपादन - गणेश पिटेकर