शहराची पाणीपुरवठा योजना आता या कारणामुळे अडचणीत...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 16 June 2020

पाणी पुरवठा योजनेसाठी निविदा भरलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींसोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी चर्चा केली. आता मुंबई येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांच्यासोबत अंतिम वाटाघाटी होणार आहेत, असे अधीक्षक अभियंता अजयसिंह यांनी सांगितले. 

औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठा योजनेची निविदा अंतिम करण्यासाठी चर्चा सुरूच आहे. सर्वात कमी दर भरलेल्या जीबीपीआर कंपनीच्या प्रतिनिधीसोबत जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आणखी दर कमी करता येईल का? यासाठी चर्चा केली. त्यानंतर आता मुंबईत अंतिम वाटाघाटी होणार असल्याचे अधीक्षक अभियंता अजयसिंह यांनी सोमवारी (ता. १५) सांगितले. दरम्यान कंपनीने दर करण्यास नकार दिल्यामुळे ही निविदा सध्या अडचणीत सापडली आहे. 

राज्य शासनाने शहरासाठी १६८० कोटी रुपयांची नवी पाणीपुरवठा मंजूर केली मात्र सत्ताबदलामुळे योजना लांबणीवर पडली होती. दरम्यान, जीवन प्राधिकरणाने पहिल्या टप्प्यातील कामाची १३०५ कोटींची निविदा प्रक्रिया सुरूच होती. फेरनिविदेनंतर जीबीपीआर कंपनी लिमिटेड मुंबई, मेघा कंपनी प्रा. लि. हैदराबाद आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शन प्रा. लि. हैदराबाद या तीन कंपन्यांनी निविदा भरल्या. जीबीपीआर या कंपनीची सर्वात कमी दराची म्हणजे ९.९ टक्के जादा दराची निविदा ग्राह्य धरण्यात आली आहे.

अरे बाप रे ..! औरंगाबादेत इंग्रजी शाळांकडून पालकांना धमक्या.

अन्य दोन कंपन्यांनी १५.५ टक्के व २१ टक्के जादा दराची निविदा भरली होती. जीबीपीआर कंपनीची सर्वात कमी दराची निविदा असल्यामुळे या कंपनीच्या प्रतिनिधींना आणखी दर कमी करता येतील का, यासाठी (निगोसिएशन) बोलावण्यात आले. कंपनीच्या प्रतिनिधींसोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता यांनी चर्चा केली. आता मुंबई येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांच्यासोबत अंतिम वाटाघाटी होणार आहेत, असे अधीक्षक अभियंता अजयसिंह यांनी सांगितले. 

दर कमी करण्यास नकार 
जीबीपीआर कंपनीने दर कमी करण्यास नकार दिला आहे असे अधिक्षक अभियंता अजयसिंह यांनी सांगितले. पाणी पुरवठा योजनेसाठी लावण्यात आलेला डीएसआर गतर्षीचा आहे, त्याचप्रमाणे एक्सलेशन प्राइज मिळणार नाही, मोब्यालिटी अॅडव्हान्स देखील मिळणार नाही. त्यामुळे निविदेत भरलेला दर योग्य आहे, आम्ही त्यावर ठाम आहोत असे कंपनीने कळवल्याचे अजयसिंह म्हणाले.

अजिंठ्यात खळबळ : दोनच दिवसांपूर्वी झाला साखरपुडा, आता... 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Water supply Aurangabad city