भाजप शहराध्यपदासाठी हे चार चेहरे आहेत चर्चेत

Who will be the BJP's city president?
Who will be the BJP's city president?

औरंगाबाद : भाजपच्या संघटनात्मक निवडीची प्रक्रिया सुरू आहे. याच माध्यमातून शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्षांची निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे. येत्या 22 जानेवारीला अध्यक्षांची निवड होणार आहे. शहराध्यक्षपदासाठी संजय केणेकर, बसवराज मंगरुळे, आमदार अतुल सावे व विद्यमान शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी शर्यतीत आहेत. यातील तनवाणी यांना पुन्हा संधी मिळणार असल्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

संघटनात्मक निवडणूक कार्यक्रमानिमित्ताने महिनाभरापासून येथील भाजप कार्यकर्त्यांची मोठी लगबग सुरू आहे. पडेगाव आणि बजाजनगर वगळता अन्य मंडळांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पार पडल्या आहेत.

यात मुकुंदवाडी चिकलठाणा मंडळ अध्यक्षपदी संजय चौधरी तसेच गुलमंडी मंडळ अध्यक्ष म्हणून सुधीर नाईक यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर हडको मंडळ अध्यक्षपदी नगरसेवक नितीन चित्ते, सिडको राजाबाजार मंडळ अध्यक्षपदी अरुण पालवे, प्रवीण कुलकर्णी यांची सातारा देवळाई, गारखेडा मंडळ अध्यक्षपदी लक्ष्मीकांत थेटे, तर अजय शिंदे यांची क्रांती चौक मंडळाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

हेही वाचा - राजकारण थांबवा, विकासाचे काय ते बोला
शहराध्यक्षपदाची निवड होणे अपेक्षित होती; परंतु उर्वरित दोन मंडळ अध्यक्ष निवडीनंतरच शहराध्यक्षपद निवडीचा कार्यक्रम भाजपने आखला आहे. निवडणूक अधिकारी म्हणून आमदार अतुल भातखळकर तर शहर सरचिटणीस कचरू घोडके हे सहायक निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहत आहेत.

कोणाची वर्णी लागते साऱ्यांचे लक्ष

दरम्यान, शहराध्यक्षपदासाठी विद्यमान शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यासह प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी शहराध्यक्ष बसवराज मंगरुळे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल मकरिये, कामगार नेते संजय केणेकर, मनपा गटनेते प्रमोद राठोड, नगरसेवक राजू शिंदे, दिलीप थोरात, शिवाजी दांडगे यांच्यासह अन्य काही नावे चर्चेत आहेत. तसेच आमदार अतुल सावे यांच्या नावाचीही ऐनवेळी चर्चा होऊ शकते, अशी माहितीही सूत्रांनी दिली. या इच्छुकांपैकी कोणाची वर्णी लागते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com