बीड जिल्ह्याला आता नऊ आमदार; संजय दौंड बिनविरोध 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

बीड - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कोट्यातून विधान परिषदेची उमेदवारी मिळालेल्या संजय दौंड यांची शुक्रवारी (ता. 17) बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. त्यांच्या विरोधातील भाजपचे प्रसाद लाड यांनी माघार घेतल्याने दौंड बिनविरोध झाले आणि बीड जिल्ह्याला आता नऊ आमदार झाले. 

विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी प्रयत्न करण्यासाठी माजी मंत्री पंडितराव दौंड यांचे पुत्र संजय दौंड यांना संधी देण्याचा शब्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिला होता. धनंजय मुंडे विधानसभेला विजयी झाल्याने विधान परिषदेची त्यांची जागा रिक्त झाली. 

हेही वाचा - अबब...बीडमध्येही चाईल्ड पोर्नोग्राफी!

राष्ट्रवादीच्या जागेवर कॉंग्रेसच्या संजय दौंड यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांच्याविरोधात भाजपचे प्रसाद लाड उमेदवार होते. मात्र, महाविकास आघाडीचे संख्याबळ अधिक असल्याने श्री. लाड यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे दौंड यांची अविरोध निवड झाली. त्यामुळे जिल्ह्याला आता नऊ आमदार झाले आहेत. 

हेही वाचा - बीड झेडपी अध्यक्ष-उपाध्यक्षांची अधिकृत निवड जाहीर

विधानसभेच्या जिल्ह्यात सहा जागा असून यात राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे, संदीप क्षीरसागर तर भाजपचे लक्ष्मण पवार, नमिता मुंदडा हे आमदार आहेत. शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे विधान परिषदेवर असून लातूर - उस्मानाबाद - बीड या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे भाजपचे सुरेश धस प्रतिनिधित्व करत आहेत. या आठ आमदारांत आता नववे संजय दौंड असतील. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed District Now Has Nine MLAs; Sanjay Daund Is Unopposed