तोल गेल्याने हायवा ट्रकच्या चाकाखाली येऊन पत्नीचा मृत्यू, बिडकीनजवळील घटना

एकनाथ हिवाळे
Thursday, 5 November 2020

औरंगाबाद येथून बिडकीन (ता.पैठण) येथे दुचाकीवरून परतत असलेल्या पतीपत्नीला ओव्हरटेकच्या नादात असलेल्या हायवा ट्रकच्या हुलकावणीने अपघात झाला. यात पत्नी ठार झाल्याची घटना बिडकीनजवळील सहयोगनगर जवळ गुरुवारी (ता.पाच) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

बिडकीन (जि.औरंगाबाद) : औरंगाबाद येथून बिडकीन (ता.पैठण) येथे दुचाकीवरून परतत असलेल्या पतीपत्नीला ओव्हरटेकच्या नादात असलेल्या हायवा ट्रकच्या हुलकावणीने अपघात झाला. यात पत्नी ठार झाल्याची घटना बिडकीनजवळील सहयोगनगर जवळ गुरुवारी (ता.पाच) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. औरंगाबाद येथून कार्यक्रम आटोपून बिडकीन येथील व्यापारी दिनेश तोतला हे सपत्नीक आपली दुचाकीवरुन (एमएच २० डीयू ७३६२) बिडकीनला परतत होते.

शहर बसच्या प्रारंभाला नाट, ई-तिकीट प्रणालीला कर्मचाऱ्याचा विरोध

दरम्यान बिडकीन जवळील सहयोग नगर येथे आले असता समोरून येत असलेल्या व औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या दोन हायवा ट्रक अतिवेगाने औरंगाबादकडे जात असल्याचे दिनेश तोतला यांना लक्षात आले. त्यामुळे त्यांनी आपल्या दुचाकीचा वेग कमी केला, परंतु अतिवेगाने व ओव्हरटेक करीत असलेल्या हायवाच्या (एमएच २० ईएल ९२९२) वाऱ्याच्या वेगाने दुचाकीवर बसलेल्या संगीता तोतला यांचा तोल गेला व त्या हायवाच्या चाकाखाली येऊन जागीच त्यांचा मृत्यू झाला.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife Died In Track Accident Near Bidkin Aurangabad News