ट्रकच्या धडकेत पत्नी ठार, पती गंभीर जखमी; औरंगाबाद-फुलंब्री रस्त्यावरील घटना

नवनाथ इधाटे
Tuesday, 29 December 2020

फुलंब्री -औरंगाबाद रस्त्यावर सावंगी पाटीजवळ एका ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी खाली पडून पत्नी जागीच ठार, तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.२९) दुपारी साडेबारा वाजता घडली.

फुलंब्री (जि.औरंगाबाद) : फुलंब्री -औरंगाबाद रस्त्यावर सावंगी पाटीजवळ एका ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील पती-पत्नी खाली पडून पत्नी जागीच ठार, तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता.२९) दुपारी साडेबारा वाजता घडली. या प्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगीताबाई शांतीलाल महेर (वय ४५) असे मृत, तर शांतीलाल विठ्ठल सिंग महेर (वय ५०, रा. भिलदरी, ता.कन्नड) असे जखमीचे नाव आहे.

 

 

 

कन्नड तालुक्यातील पिशोर बाजुस असलेल्या भिलदरी या गावचे रहिवासी शांतीलाल महेर हे दुचाकीवरुन (एमएच २० बीयू ५६७२) पत्नीसह फुलंब्रीमार्गे औरंगाबादला जात असताना पाठीमागून येणारी ट्रकने (एमएच २० एटी ५०९५) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात दोघे पती-पत्नी खाली पडले. संगीताबाई माहेर यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्यात त्या जागीच ठार झाल्या तर त्यांचे पती शांतीलाल गंभीर जखमी झाले आहे.

 

 

जखमींना फुलंब्री येथील महात्मा फुले क्रीडा रुग्णवाहिकेद्वारे चालक विजय देवमाळी याने फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून संगीताबाई माहेर याना मृत घोषित केले. तर शांतीलाल महेर यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wife Died In Truck Accident, Husband Serious Injured Aurangabad News