धक्कादायक! हिंस्र प्राण्याने १२ शेळ्यांचा पाडला फडशा, शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान

Aurangabad Today News
Aurangabad Today News

आडुळ (जि.औरंगाबाद) : शेतातील लोखंडी शेडमध्ये बांधलेल्या बारा शेळ्यांचा अज्ञात हिंस्र प्राण्याने हल्ल्या करुन फडशा पाडल्याची घटना मंगलवारी (ता.दोन) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. अभिषेक बाळु कारंजकर यांची आडुळ बुद्रूक (ता.पैठण) शिवारात गट क्रमांक २९७ मध्ये शेती आहे. शेताला जोडधंदा म्हणून ते शेळीपालन व्यवसाय करतात. यासाठी त्यांनी शेतात लोखंडी शेड केलेला असुन त्यात बकऱ्या बांधतात.

मंगळवारी संध्याकाळी या शेडमध्ये शेळ्या बांधून ते घरी आले. बुधवारी (ता.तीन) सकाळी परत शेतात गेल्यावर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. सदरील घटनेची माहिती महसूल व वनविभागाला देण्यात आली आहे.



माझ्या बारा शेळ्या हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात ठार झाल्या असुन यात माझे ७० ते ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याचा पंचनामा करुन शासनाने मला नुकसान भरपाई द्यावी. - अभिषेक कारंजकर, शेतकरी

संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com