अटक न करण्यासाठी पन्नास हजारांची लाच घेणारा पीएसआय 'एसीबी'च्या जाळ्यात 

अनिल जमधडे
Friday, 23 October 2020

  
अटक करण्याची दाखवली होती भीती 

औरंगाबाद : सर्वसामान्यांना पोलिसांचा आधार असतो. मात्र, औरंगाबादेत एका वरिष्ठ पोलिस अधिकार्यानेच संशयिताला गुन्हात अटक करीन, सहआरोपी बनवेन अशा धमक्या दिल्या. जर असे करायचे नसेल तर पन्नास हजार द्या, अशी मागणी केली. अखेर लाच घेणाऱ्या या पोलिस उपनिरीक्षकाला एसीबीने बेड्या ठोकल्या आहेत.  
सिटी चौक पोलिस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटक न करण्यासाठी ५० हजारांची लाच घेणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. संतोष रामदास पाटे (वय ३० रा. पडेगाव) असे लाचेचा आरोप असलेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिटी चौक पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात सहआरोपी न करणे आणि अटक न करणे यासाठी एका ५८ वर्षीय व्यक्तीला पोलिस उपनिरीक्षक संतोष रामदास पाटे याने पन्नास हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यानुसार सापळा लावण्यात आला, बुधवारी (ता. २१) पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिस उपनिरीक्षक पाटे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून लाचेचे पन्नास हजार रुपयेही जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक संदीप राजपूत यांच्यासह पथकातील गणेश पंडुरे, गोपाल बरंडवाल, किशोर म्हस्के, केवल गुसिंगे यांनी केली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

संशयावरुन वारंवार चौकशीला बोलवायचा 
फक्त संशयावरून हा पोलीस त्याला वारंवार चौकशीसाठी बोलवत होता आणि सहआरोपी करण्याची धमकी देत होता. पैसे उकळण्यासाठीच तो हे उद्योग करत होता, असे समोर आले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दुकान खाली करण्यासाठी भाडेकरू महिलेला मारहाण 

दुकान खाली करण्याच्या कारणावरून महिलेला मारहाण करणाऱ्या आई व मुलीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. दुकान आमचे आहे, तू येथून चालती हो, असे सांगत दुकानमालक महिला आणि तिच्या मुलीने सोमवारी (ता. १९) रात्री दुकानाचा वीजपुरवठा खंडित केला. त्यानंतर भाडेकरू महिलेला मारहाण केली. याप्रकरणी दुकानमालक महिला व तिच्या मुलीच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ACB arrests PSI for accepting bribe 50 thousand aurangabad news