जिल्हाधिकाऱ्यांनी पाचशे रुपयांचा दंड केला अन् जागेवर मास्क ही दिला

शेखलाल शेख
Tuesday, 25 August 2020

जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो शाखेमार्फत आयोजित सामाजिक वनीकरण विभागाच्या बैठकीत विनामास्क उपस्थित असलेल्यांना जिल्हाधिकारी यांनी दंड केला.

 

औरंगाबाद: विमा मास्क फिरणाऱ्यांना दंड तसेच जागेवरच मास्क देणार असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले होते. त्यानंतर त्यांनी मंगळवार (ता.२५) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो शाखेतर्फे आयोजित सामाजिक वनीकरण विभागाच्या बैठकीत विनामास्क आलेल्या चार अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचशे रुपयांचा दंड केला.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी मास्क परीधान न करणाऱ्यांना ५०० रुपये दंड लावून एक मास्क देण्याचा नुकताच आदेश काढला. या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरुच आहे.

हेही वाचा- पोलिसाने केला अत्याचार

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात रोहयो शाखेमार्फत आयोजित सामाजिक वनीकरण विभागाच्या बैठकीत विनामास्क उपस्थित असलेल्यांना जिल्हाधिकारी यांनी दंड केला.

यावेळी वैजापूर वनपरिक्षेत्र अधिकारी एम. के. रहाटवळ, सोयगाव वनपरिक्षेत्र अधिकारी ए. पी. मिसाळ, कन्नड वनपरिक्षेत्र अधिकारी छाया बानखेले, वाहनचालक साईनाथ चंदनसे या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना तसेच ज्ञानेश्वर त्रिभुवन या अभ्यागत यांनी मास्क परीधान न केल्यामुळे प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारुन त्यांना एक मास्क देण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Without Mask Entry Officer Fine In Aurangabad