esakal | सोन्याची पोत लांबविणाऱ्या महिलेस तब्बल ९ महिन्यानंतर अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Arrested News.j

दुकानात कपडे खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधील सोन्याची पोत लांबविणाऱ्या महिलेला उस्मानपूरा पोलिसांनी तब्बल नऊ महिन्यांनंतर मंगळवारी (ता.८) रात्री अटक केले. अनिता पारलेस काळे (३०, रा. शिवाजी नगर, पाचोड बसस्टॅण्ड परिसर ता. पैठण) असे आरोपी महिलेचे नाव आहे. 

सोन्याची पोत लांबविणाऱ्या महिलेस तब्बल ९ महिन्यानंतर अटक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद: दुकानात कपडे खरेदीसाठी गेलेल्या महिलेच्या पर्समधील सोन्याची पोत लांबविणाऱ्या महिलेला उस्मानपूरा पोलिसांनी तब्बल नऊ महिन्यांनंतर मंगळवारी (ता.८) रात्री अटक केले. अनिता पारलेस काळे (३०, रा. शिवाजी नगर, पाचोड बसस्टॅण्ड परिसर ता. पैठण) असे आरोपी महिलेचे नाव आहे. 

प्रकरणात विमलबाई पवार (३५, राहुलनगर, उस्मानपुरा) या १४ जानेवारी रोजी सोन्याची एकदानी गाठविण्यासाठी व मुलीला कपडे खरेदी करण्यासाठी पीरबाजारात गेल्या होत्या. त्यांनी गौरी ज्वेलर्स येथे एकदानी गाठवून ती गळ्यात घातली. त्यानंतर त्या श्रीमान कलेक्शन येथे कपडे खरेदी करण्यासठी गेल्या.  त्यावेळी त्यांनी ती गळ्यातील एकदानी एका प्लॉस्टीकच्या डब्यात टाकून पर्समध्ये ठेवले. दुपारी साडेतीन वाजता विमलबाई या जयदुर्गा कलेक्शन या दुकानात मुलीचे कपडे खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या.

हेही वाचा- मध्य प्रदेशच्या भाचीला ६ वर्षांनी सापडली महाराष्ट्रात मामी, एका फोनवर पोलिसांनी घेतला शोध 

त्यावेळी त्यांनी पर्स मुलीकडे दिली. गर्दी फायदा घेऊन चोराने त्यांच्या पर्समधील ३० हजार रुपये किंमीतीची सोन्याची एकदाणी लांबविली. याप्रकरणी उस्मानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तपास करुन तब्बल नऊ महिन्यांनी एकदानी चोरणाऱ्या आरोपी महिलेला अटक केली. तिला न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने आरोपी महिलेला ११ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. 

कत्तलीसाठी जनावरे नेणारे दोघे अटकेत 

औरंगाबाद: कत्तलीसाठी जनावर नेणाऱ्या दोघांना क्रांतीचौक पोलिसांनी बुधवारी (ता.९) सकाळी ताब्यात घेतले. शेख मोईन शेख उस्मान (४१, रा. जुनाबाजार) व शेख शाहरुख शेख गुलाम हुसेन (२०, रा. अन्सार कॉलनी, पडेगाव) अशी त्या आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या ताब्यातून ११ गायींसह चार बैल व एक गोऱ्हा असे सुमारे दोन लाख १३ हजारांची १६ जनावरे आणि दोन लाखांचे एक आयशर वाहन असा सुमारे चार लाख १३ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. 

हेही वाचा- कचऱ्याप्रमाणे व्हेंटीलेटर जिल्ह्यात टाकू दिले, खासदार जलील असे का म्हणाले?