स्त्रियांनो, प्रिस्क्रिप्शनशिवाय स्टेरॉईड टाळा - डॉ. टाकळकर 

राजेभाऊ मोगल
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

औरंगाबाद  : स्त्रियांनो, विनाप्रिस्क्रिप्शन स्टेरॉईडच्या मलमांचा वापर टाळा, असे आवाहन त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आसावरी टाकळकर यांनी येथे केले. इंडियन मेडिकल असोसिएशन, वुमन्स डॉक्‍टर विंग आणि जागृती मंचतर्फे मंगळवारी (ता. 11) माझी ओळख या विशेष कार्यक्रमांतर्गत डॉ. टाकळकर बोलत होत्या.

 

औरंगाबाद  : स्त्रियांनो, विनाप्रिस्क्रिप्शन स्टेरॉईडच्या मलमांचा वापर टाळा, असे आवाहन त्वचारोगतज्ज्ञ डॉ. आसावरी टाकळकर यांनी येथे केले. इंडियन मेडिकल असोसिएशन, वुमन्स डॉक्‍टर विंग आणि जागृती मंचतर्फे मंगळवारी (ता. 11) माझी ओळख या विशेष कार्यक्रमांतर्गत डॉ. टाकळकर बोलत होत्या.

 

हेही वाचा : लग्नानंतर स्पर्धापरीक्षेची तयारी, झाल्या तहसीलदार   

त्या म्हणाल्या, की बऱ्याच वेळा आपल्याला काही त्वचारोग झाल्यास, पिंपल आल्यास, कुठे खाज आल्यास, गजकर्ण झाल्यास आपण परस्पर मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन खाजेची गोळी घेतो किंवा काही क्रीम आणून लावतो. या परस्पर उपचारांमुळे सुरवातीस चांगला फरक पडल्यासारखे वाटते; परंतु हे मलम लावणे सोडल्यावर आपला आजार आणखी बळावतो. कारण बहुतांश वेळा या अशा क्रीम्समध्ये स्टेरॉईड्‌सची मात्रा असते. त्यामुळे डॉक्‍टरांच्या सल्ल्याशिवाय स्टेरॉईडयुक्त मलम लावणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले. 

हेही वाचा : निकम साहेब.. हे जेवण मीच बनवलेय ना

डॉ. वैशाली मसलेकर यांनी औरंगाबाद शहर रात्री महिलांसाठी सुरक्षित कसे करता येईल याविषयी त्यांच्यातर्फे घेण्यात येणाऱ्या प्रयत्नांविषयी माहिती दिली. उपस्थितांनी त्यांच्या प्रयत्नांना भरभरून दाद दिली. डॉ. गणवीर यांनी त्यांच्या संस्थेविषयी माहिती दिली. 
डॉ. सुरेखा मराठे यांनी मानसिक आरोग्य व आजची स्त्री याविषयी विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. रश्‍मी बोरीकर, डॉ. अर्चना भांडेकर, आयएमएचे अध्यक्ष डॉ. सत्यनारायण सोमाणी, सचिव डॉ. यशवंत गाडे, जागृती मंचतर्फे प्रा. भारती विश्वास, शर्मिष्ठा रोडगे यांनी विशेष प्रयत्न केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women, Avoid Steroids Without Prescription - Dr. Takalkar