किती छान! पोलिस ठाण्याचा कारभार महिलांच्या हाती

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 March 2020

जागतिक महिला दिनानिमित्त सिल्लोड शहर पोलिस ठाण्याची कायदा व सुव्यवस्था रविवार (ता. आठ) महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांभाळली. 

सिल्लोड (औरंगाबाद) : जागतिक महिला दिनानिमित्त सिल्लोड शहर पोलिस ठाण्याची कायदा व सुव्यवस्था रविवार (ता. आठ) महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सांभाळली. 

सकाळपासूनच शहर पोलिस ठाण्यात महिला कर्मचाऱ्यांनी ठाण्याचा कारभार हाती घेतला होता. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र बोकडे, सहायक पोलिस निरीक्षक नालंदा लांडगे, फौजदार सुनील अंधारे यांनी महिला कर्मचाऱ्यांना फेटे बांधून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

संताप येईल तुम्हाला ही बातमी वाचाल तर...

यावेळी सहायक पोलिस निरीक्षक नालंदा लांडगे यांनी ठाण्याचा प्रभार हाती घेऊन कामाला सुरूवात केली. रविवारचा आठवडे बाजार असल्याने शहरासह ठाण्याला गर्दीचा विळखा पडला होता. यावेळी महिला कर्मचाऱ्यांनी व्यवस्थितपणे कायदा, सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळली.

यामध्ये कर्मचारी वैशाली सोनवणे, जयश्री महालकर, कविता वाढेकर, नीता दांडगे यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

असे होते शिवाजी महाराजांचे हस्ताक्षर...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Womens Day Sillod Police Station Aurangabad News