बचतगटातून उभे केले महिलांचे संघटन 

Aurangabad News
Aurangabad News
Updated on

औरंगाबाद - पूर्वी स्त्री ही चूल आणि मूल एवढ्यावरच मर्यादित होती; मात्र आता कार्यालयातच नव्हे, रानातही तेवढ्याच जोमाने राबते आहे. असे असले तरी महिलांचे प्रश्‍न वाढतच चालले असून, ते सोडविण्यासाठी महिलांनीच पुढे यायला हवे, यासाठी 
रंजना वेळंजकर या काम करीत आहेत.

स्वत: सातवीपर्यंतच शिक्षण घेतलेल्या रंजना यांना विविध छंद असून त्या आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून छंद जोपासत आहेत. गरजवंत महिलांना हवी ती मदत करण्यासाठी कुणाची तरी वाट पाहत बसण्यापेक्षा आपणच पुढे यायचं ठरवलं आणि काम सुरू केले.

गरजू महिलांना मोफत शिवणकाम, बचतगटाची चळवळ सुरू केली. आपण केलेल्या मदतीमुळे आज अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या याचा खूप आनंद असल्याचे त्या सांगतात. हे बळ समाजाचा विरोध पत्करून अंगावर दगड, माती, शेण झेललेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून मिळाल्याचे त्या सांगतात. 

आधी केले मग सांगितले... 
स्वत:चा प्रवास सांगताना त्या म्हणाल्या, की वाचनातूनच प्रेरणा मिळाली आणि आपणही आता मागे राहायचे नाही असे ठरवून सर्वप्रथम महिलांचे छोटे का असेना; पण एक संघटन उभे केले. त्यांना मार्गदर्शन करत बचतगटाच्या माध्यमातून आपण आर्थिक प्रगती कशी करू शकतो, हे शिकवले आणि बघता बघता एकीचे बघून दुसरी, दुसरीचे बघून तिसरी अशा अनेक जणी आज अतिशय चांगल्या पद्धतीने बचतगट चालवत आहेत. याचा आपल्याला आनंद आहे.

आपण कुठलाही क्लास न लावता बऱ्याच कला आत्मसात केल्या त्याचा अभिमान नाही; पण आत्मसमाधान मात्र नक्कीच आहे. त्या कलेतील एक कला म्हणजे शिवणकला. हे काम मी आजही करते. महिलांचे प्रश्न सोडवत त्यांच्या मदतीला धावून जाणे हे काम आपल्याला मनापासून आवडते. त्यामुळेच मी ते मनापासून करू शकते. गरजवंत महिलांसाठी यापुढेही काम करत राहायचे आहे, असेही त्या सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com