
औरंगाबाद : राज्य सरकारने मंजूर केलेल्या १५२ कोटीच्या निधीतून आता एमएसआरडीसीकडे (राज्य रस्ते विकास महामंडळ) असलेल्या सात रस्त्यांची कामे सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रस्त्यांची कामे सुरु करण्याची तयारी सुरु केल्याची माहिती एमएसआरडीसीच्या कनिष्ठ अभियंत्याने महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी घेतलेल्या बैठकीत दिली.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
राज्य शासनाने शहरातील रस्त्यांच्या १५२ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून एमआयडीसी, एमएसआरडीसी आणि महापालिका मिळून २३ रस्त्यांची कामे करणार आहेत. एमआयडीसीने पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशानंतर सात रस्त्यांची कामे सुरू केली आहेत तर एमएसआरडीसीने सात व महापालिकेने नऊ रस्त्यांची निविदा अंतिम केली आहे. मात्र, निधीसंदर्भात अद्याप राज्य शासनानाकडून पत्र प्राप्त न झाल्याने ही कामे सुरू होऊ शकली नव्हती. असे असतानाच आता एमएसआरडीसीने कामे सुरू करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शविली आहे. महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी नुकतीच यासंदर्भात आढावा बैठक घेतली. यावेळी एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता अभंग यांच्यातर्फे हजर असलेल्या कनिष्ठ अभियंत्याने सात रस्त्यांची कामे लवकरात सुरु केले जाणार असल्याचे सांगितले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
एमएसआरडीसीकडील रस्ते
(Edited By Pratap Awachar)