CoronaVirus : त्यांच्यासाठी सोडल्या बॉर्डरपर्यंत पाच एसटी बस 

अनिलकुमार जमधडे
Tuesday, 12 May 2020

शहरात अडकलेल्या कामगारांना 
राज्याच्या हद्दीपर्यंत मोफत प्रवास 

औरंगाबाद : लॉकडाउनच्या अनुषंगाने अडकलेल्या मजुरांना सोडण्यासाठी एसटी महामंडळाची तयारी झाली आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणापर्यंत या बसगाड्या सोडण्यात आल्या आहेत. या पाच बसगाड्यांद्वारे तब्बल ११० मजुरांना सोशल डिस्टंन्सिंगचे पालन करुन रवाना करण्यात आले आहे. 

लॉकडाउनमुळे विविध भागांतील मजूर अडकून पडले आहेत. शासन पातळीवर वेळेवर निर्णय न झाल्यान मजुरांचे लोंढे मिळेल त्या मार्गाने आपल्या राज्यात प्रवासाला निघाले आहेत. अनेक कुटुंब आणि लहान मुलांसह शेकडो किलोमिटरची पायपीट करत आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

अखेर प्रशासनाला जाग 

रस्त्याने पोलिस आडवतात म्हणुन रेल्वेमार्गाने निघालेल्या १६ मजुरांना करमाडजवळ चिरडल्याच्या घटनेनंतर खडबडुन जागे झालेल्या प्रशासनाने काही प्रमाणात एसटी बसची सोय केली आहे. या कामगारांना सोडण्यासाठी राज्य शासनाने एसटी महामंडळाच्या बसगाड्या सोडण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर प्रत्यक्ष प्रक्रियेला सोमवारी (ता. ११) सुरवात झाली. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

एसटीने सोडल्या पाच बस

पोलिसांकडून प्रवासासाठी परवानगी मिळाल्यानंतर कन्नड येथून एक बस मध्य प्रदेशची हद्द मुक्ताईनगर पर्यंत सोडण्यात आली आहे. औरंगाबाद येथून दुसरी बस मध्य प्रदेश बॉर्डरपर्यंत रेवा गावापर्यंत पाठविण्यात आली आहे. औरंगाबाद येथून तिसरी बस कागल निपाणी या कर्नाटक हद्दीपर्यंत पाठविण्यात आली आहे. तसेच आणखी एक बस गोंदियापर्यंत सोडण्यात आली आहे. तर पाचवी बस औरंगाबादहून तेलंगणा हद्दीपर्यंत सोडण्यात आली आहे. 

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

पोलिसांची घेतली परवानगी 

बस पाठविण्यापूर्वी पोलिस आयुक्तालयाची परवानगी घेण्यात आली. त्यानुसार या बस पाठविण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी दिली. याशिवाय वाशीम येथे जाण्यासाठी तीसगाव येथील एका ठेकेदाराने स्वखर्चाने एक बस बुक केली होती, ती बस पाठविण्यात आली, तसेच आणखी एक बस गांधेली येथून ट्रेनिंग सेंटरच्या विद्यार्थ्यांना घेऊन निजामाबादला रवाना झाली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: To the workers Free travel to state borders