वाहतूकीचे धडे द्यायला चक्क यमराजा उतरलाय रस्त्यावर : नियम भंग करणाऱ्यासोबत सेल्फी

मधुकर कांबळे
मंगळवार, 14 जानेवारी 2020

शहरामध्ये बेशिस्त वाहतूकीची समस्या गंभीर झाली आहे, सिग्नल न पाळणे, झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे वाहन उभे करणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, गाडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवणे, वाहतुकीचे नियम मोडणे असे प्रकार शहरामध्ये सर्रास सुरू असतात. बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करून सुद्धा हे प्रकार कमी होत नाहीत. त्यामुळे पोलिस आयुक्त कार्यालय व प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या वतीने 11 जानेवारी ते 17 जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान राबवले जाते, त्याचाच एक भाग म्हणून अँब्युलन्स हेल्प रायडर्स समूहाच्या वतीने "सेल्फी विथ यमराज' उपक्रम राबवत वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले.

औरंगाबाद : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांत थेट यमराज व चित्रगुप्तची वेशभूषा केलेल्या सोबतच जनजागृती करण्याचा उपक्रम अमरप्रित चौकात मंगळवारी (ता.14) अँब्युलन्स हेल्प रायडर्स समूहाच्या वतीने राबवण्यात आला. बेशिस्त वाहनांना शिस्त लावण्यासाठी सेवा सप्ताह उपक्रमांतर्गत अँब्युलन्स हेल्प रायडर्स आयोजित "सेल्फी विथ यमराज" या अनोख्या उपक्रमात रायडर्सचे सदस्य सहभागी झाले होते. 

हेही वाचा-मुख्यमंत्र्यांचा तो आदेश धुडकावला : सत्ताबदलानंतर महापालिकेत शिवसेना-भाजपात...

शहरामध्ये बेशिस्त वाहतूकीची समस्या गंभीर झाली आहे, सिग्नल न पाळणे, झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे वाहन उभे करणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे, गाडीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसवणे, वाहतुकीचे नियम मोडणे असे प्रकार शहरामध्ये सर्रास सुरू असतात. बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करून सुद्धा हे प्रकार कमी होत नाहीत. त्यामुळे पोलिस आयुक्त कार्यालय व प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या वतीने 11 जानेवारी ते 17 जानेवारी रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान राबवले जाते, त्याचाच एक भाग म्हणून अँब्युलन्स हेल्प रायडर्स समूहाच्या वतीने "सेल्फी विथ यमराज' उपक्रम राबवत वाहतुकीचे नियम पाळण्यासंदर्भात आवाहन करण्यात आले. अमरप्रित चौकात यमराजाची वेशभूषा व चित्रगुप्त यांची वेशभूषा करून आलेले युवक यांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या नागरिकांसोबत सेल्फी घेऊन वाहतुकीचे नियम पाळावे असे आवाहन केले व त्यांना गुलाब पुष्प देऊन गांधीगिरी सुद्धा करण्यात आली. वाहतुकीचे नियम मोडून अपघाताला निमंत्रण देणाऱ्या नागरिकांपुढे येऊन त्यांनी "करू नका घाई, नाहीतर खरा यमराज उभा राहील दारी' हा संदेश वाहन चालकांना यावेळी दिला. अचानक गाडी समोर आलेले यमराज बघून अनेक वाहन धारक गडबडले, तर यमराजला बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी सुद्धा झाली होती. तरी अँब्युलन्स हेल्प रायडर्स समूहाच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमात आरटीओ अधिकारी रमेशचंद्र खराडे यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

हे वाचलंत का?- नामविस्तारानंतरचे विद्यापीठ आम्हाला हवेय असे...!

या उपक्रमात संदीप कुलकर्णी, भुषण कोळी, देवा मनगटे, विनोद रुकर, सुधीर व्यास, जगदीश एरंडे, अभिषेक कादी, स्मिता नगरकर, किरण शर्मा, शिवांगी कुलकर्णी, मनोज जैन, रितेश जैन, अमोल पाटील, ओंकार संगेकर, कृष्णा तुंगे, वंदना जैन, अनुराग कुलकर्णी, अश्विन जोशी, दीपक साळवे, नारायण पांडव, डॉ रोहित बोरकर, पवन भिसे, पुतुल पानसे, अक्षय जैन, श्रीनिवास लीगदे, पराग लिगदे, आकाश मिरगे, स्वप्नील घोडके, प्रशांत अवसरमल, रवी पाटील यांची यावेळी उपस्थित होती. या सर्व सदस्यांनी या वेळी वाहतुकीत अडकलेल्या रुग्णवाहिकेला सुद्धा रस्ता मोकळा करून दिला. तसेच लोकांना अपघाग्रस्तांना मदत करा असे आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आले.

क्लिक करा- मुख्यमंत्र्याच्या स्वागतासाठी आले अन दंड भरुन गेले   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yamraja awaring about use of Helmet and zebra crossing