(व्हिडिओ पाहा) राज ठाकरे म्हणतात, शेतकऱ्यांना मी ज्ञान पाजळू शकत नाही, कारण....

सुशांत सांगवे
Saturday, 1 February 2020

‘‘शेती विषयाचे ज्ञान मी शेतकऱ्यांना पाजळू शकत नाही. कारण महाराष्ट्रातील शेतकरी आधीपासूनच प्रयोगशील आहे’’, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांबाबत कौतूकोद्गार काढले. भारतामध्ये घुसलेल्या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी मुंबईत येत्या रविवारी (ता. ९) मोर्चा काढण्यात येणार आहे. यात सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

लातूर : ‘‘शेती विषयाचे ज्ञान मी शेतकऱ्यांना पाजळू शकत नाही. कारण महाराष्ट्रातील शेतकरी आधीपासूनच प्रयोगशील आहे’’, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांबाबत कौतूकोद्गार काढले. भारतामध्ये घुसलेल्या घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी मुंबईत येत्या रविवारी (ता. ९) मोर्चा काढण्यात येणार आहे. यात सहभागी व्हा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा समारोप ठाकरे यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. १) झाला. या वेळी त्यांच्या हस्ते ‘शेती दवाखाना’ आणि शेतकऱ्यांच्या मुलांना आधार देण्यासाठी ‘बळीराजा शिष्यवृत्ती योजना’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार राजू पाटील, मनसेचे नेते अनिल शिदोरे, प्रकाश महाजन, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, प्रदर्शनाचे आयोजक आणि महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष नागरगोजे याप्रसंगी उपस्थित होते.

हेही वाचा-  (व्हिडिओ पाहा) भाषण संपविण्याची चिठ्ठी येताच, तुमच्या संमेलनाची शोभा वाढवायला आलो नाही म्हणत साहित्यिक डाॅ. अक्षयकुमार काळे संतापले

ठाकरे म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात प्रयोगशील शेतकरी आहे. महाराष्ट्राबरोबरच पंजाब, हरियाणा येथेही प्रयोगशील शेतकरी पहायला मिळतात. अशा शेतकऱ्यांना कृषी प्रदर्शनाचा नक्कीच उपयोग होईल. शेतकऱ्यांना आम्ही शेतीविषय सल्ला देणार नाही. पण शेतकऱ्यांसाठी झटणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी शेतकऱ्यांनी उभे राहावे, असे आम्हाला वाटते. हे सांगण्यासाठीच मी लातूरात आलो आहे.’’ नागरगोजे म्हणाले, मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी मागील सरकारने फार काही कामे केली नाहीत. त्यामुळे दुष्काळाचे सावट कायम आहे. दुष्काळ हटावा म्हणून राज ठाकरे यांनी आम्हा कार्यकर्त्यांना १ हजार वनराई उभारण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यादृष्टीने आम्ही कामाला लागलो आहोत.’’

क्लिक करा- वारे...पठ्ठ्या...! केवढे हे कौतूक...  पोलिस अधीक्षकांनी कडेवर घेत केला सत्कार

मोर्चानंतर होणार मराठवाडा दौरा
मागील आठवड्यात राज ठाकरे हे मराठवाडा दौरा करणार होते. पण, आजारपणामुळे त्यांना मराठवाडा दौरा रद्द करावा लागला. त्यामुळे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. मात्र, मुंबईत येत्या रविवारी (ता. ९) मोर्चा झाल्यानंतर पहिला दौरा मी मराठवाड्याचा करणार आहे, असे ठाकरे यांनी याप्रसंगी जाहीर केले. सर्दी आणि खोकला झाल्यामुळे त्यांनी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या समारोप सोहळ्यातही अवघ्या तीन मिनिटांत आपले भाषण आटोपते घेतले. आजारपणामुळे मला आपणाशी जास्त संवाद साधता येणार नाही, अशी दिलगिरीही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

हे वाचलंत का?- राज्य महार्गावर दरोडेखोर - पोलिसांत चकमक, हवेत गोळीबार:पोलिस निरीक्षक जखमी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Raj Thackeray saying about farmer in latur