नदीत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

शेख मुनाफ
Monday, 21 September 2020

घारेगाव येथे पोहण्यासाठी उतरलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

आडुळ (जि.औरंगाबाद) : नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांपैकी एकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.२०) दुपारी बारा वाजेच्या दरम्यान घारेगाव (ता.जि.औरंगाबाद) येथे घडली. शोहेब शेख हा घारेगाव येथील चाऊस कुटुंबाकडे पाहुणा म्हणून आला होता. गावाजवळील नदीला पुर आलेला, नदी धो-धो वाहत असल्याने शोहेब शेख व सोहेल शफिक चाऊस हे पोहण्यासाठी नदीत गेले उतरले होते. दोघांना पोहता येत नसल्याने नदीत उतरताच दोघेही गटांगळ्या खात होते.

त्यावेळी गावातील शिवनाथ कतारे हे बाजूच्या शेतात काम करीत असताना त्यांना या तरुणांचा वाचवावाचवा असा आवाज ऐकु आला. त्यामुळे त्यांनी घटनास्थळी धाव घेतली व दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. शोहेबला वाचविल्यानंतर सोहेल चाऊस हा दिसलाच नाही.त्यामुळे त्याला वाचविता आले नाही. त्यानंतर तरुण पाण्यात बुडाल्याची माहिती गावात पसरल्याने ग्रामस्थांनी दुपारपर्यंत घारेगावपासुन कोळघरपर्यंत शोध घेतला.

शाळा विकणे आहे, खरेदीदार मिळेल का? कोरोनाचा शिक्षण क्षेत्राला मोठा फटका

मात्र तो मिळुन येत नसल्याने त्यानंतर ग्रामस्थांनी करमाड येथील पोलिस ठाणे व अग्निशामक दलाला माहिती दिली. दुपारी तीन वाजल्यापासून पोलिस व अग्निशामक दलाचे जवान या तरुणाचा शोध घेत होते. मात्र तो पाण्यात बुडालेला तरुण संध्याकाळी सात वाजेपर्यंत आढळून आला नाही. अंधार होत असल्याने शोध कार्य थांबविण्यात आले होते. आज सोमवारी (ता.२१) सकाळी चाऊस कुटुंबातील महिला घटनास्थळी गेल्या असता त्यांना सोहेल चाऊस या तरुणाचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. त्यांनतर ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह बाहेर काढला.

संपादन - गणेश पिटेकर

 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Died After Drowned Aurangabad News