#SaathChal संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 July 2018

पैठण - पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशी यात्रेच्या उत्सवानिमित्त पांडुरंगाच्या भेटीसाठी, दर्शनासाठी गुरुवारी (ता. पाच) संत एकनाथ महाराजांच्या पालखी पायी दिंडी सोहळ्याचे पंढरपूरकडे येथून सायंकाळी साडेसहाला प्रस्थान झाले.

यावेळी पालखी सोहळ्याला निरोप देण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी गोदाकाठी उसळली होती. पालखी सोहळ्याच्या प्रस्थानापूर्वी नाथांच्या वाडा मंदिरात पालखीतील नाथ पादुकांचे पूजन नाथवंशज रघुनाथबुवा गोसावी यांनी केले.

यानंतर नाथ मंदिरातून नाथ समाधी मंदिरात पालखी दर्शनासाठी ठेवण्यात आली. येथे भाविकांचे दर्शन झाल्यानंतर प्रस्थानस्थळी गोदाकाठी चारला पालखी ओटा येथे आणण्यात आली. महिला, पुरुष भाविकांनी रांगेत उभे राहून पादुकांचे दर्शन घेतले. दोन तासांचा दर्शन सोहळा आटोपल्यानंतर पालखी दिंडी सोहळ्याला निरोप देण्यात आला. पालखी सोहळ्यासाठी नगरपालिकेतर्फे भव्य मंडप उभारण्यात आला असल्यामुळे रिमझिम पावसातही भाविकांचे सुरळीत दर्शन पार पडले. 

हेलिकॉप्टरच्या पुष्पवृष्टीने भाविक भारावले
पालखी सोहळ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच नगराध्यक्ष सूरज लोळगे, भाजपचे तालुकाध्यक्ष तुषार शिसोदे यांनी हेलिकॉप्टरमधून पालखी सोहळ्यावर पुष्पवृष्टीचा वर्षाव केल्यामुळे उपस्थित भाविक भारावून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. पावणेपाच वाजता हेलिकॉप्टरचे आगमन झाले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: #SaathChal Wari Palkhi Timetable 2018 sant eknath maharaj palkhi