वीज कोसळून जनावरे दगावली

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

चाकूर / जळकोट(जि. लातूर ) ः चाकूर आणि जळकोट शहरासह दोन्ही तालुक्‍यांतील विविध भागांत रविवारी (ता. सहा) विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. पाऊस सुरू असताना वीज कोसळल्याने एक म्हैस आणि इतर अकरा अशी बारा जनावरे दगावली आहेत. 


डोंग्रज (ता. चाकूर) येथे रविवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली, यात वीज कोसळून अकरा शेळ्या दगावल्या आहेत. चाकूर शहरात सकाळी अकराच्या सुमारास अचानक पावसाला सुरवात झाली. जवळपास पंधरा मिनिटे जोरदार पाऊस झाला. यासोबतच विविध भागांत पावसाने हजेरी लावली. सध्या सोयाबीन काढणी सुरू असल्यामुळे अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. 


डोंग्रज येथील एका शेतातील झाडावर वीज पडल्यामुळे बापूराव झुमकेवाड आणि बिरू काळे यांच्या अकरा शेळ्या दगावल्या आहेत.
येवरी (ता. जळकोट) येथे वीज कोसळल्याने म्हैस दगावल्याने शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. शिवाजी सीताराम गव्हाणे यांनी त्यांच्या 
शेतात रविवारी म्हैस बांधली होती. दुपारी झालेल्या पावसात वीज कोसळून तिचा मृत्यू झाला.

यात शेतकऱ्याचे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्‍यात जोरदार वारा आणि पाऊस येत असल्याने हाताशी आलेले सोयाबीन आणि ज्वारीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com