परभणी जिल्ह्यातील ` या ` तलावावर पक्ष्यांचा मेळा

BIRD
BIRD

जिंतूर : जिंतूर तालुक्यातील (जि.परभणी) डोंगराळ भागात कवडा गावाच्या परिसरातील तलावावर वेगवेगळ्या एकवीस प्रकारचे २७० पक्षी पक्षीमित्रांना आढळून आले आहेत. या पक्षांनी कावडा तालाव फुलला आहे.

येथील पक्षीमित्र विजय ढाकणे, अनिल उरटवाड, डॉ. सुमेर मोहारे आणि गणेश कुरा यांनी पक्षी सप्ताहानिमित्त तालुक्यातील डोंगराळ भागात भटकंती करत तलाव, पाणवठे या ठिकाणी पक्षांचे निरीक्षण केले असता कवडा येथील तलावात वेगवेगळ्या एकवीस जातींचे जवळपास २७० पक्षी विहार करताना आढळून आले. पाच नोव्हेंबर हा पक्षी अभ्यासक मारुती चितमपल्ली यांचा जन्मदिवस तसेच बारा नोव्हेंबर हा जागतिक पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांची जयंतीनिमित्त पक्षीसप्ताह साजरा करण्यात आला. या निमित्त जिंतूर शहरातील पोदार जंबो किड्स विद्यालयात पक्षीमित्र ढाकणे , ज्ञानेश्‍वर गिराम (जालना) यांच्या पक्षी छायाचित्रांचे रविवारी (ता.दहा) प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला नागरिकांचा प्रतिसाद होता.

पक्षांचा अधिवास धोक्यात


जिंतुर तालुक्यात पूर्णा नदीच्या काठावर वनांचे क्षेत्र आहे. तसेच येलदरी धरणासह अन्य २० हुन अधिक लहान तलाव आहेत. या भागातील डोंगर-दऱ्या पावसाळ्यात हिरव्यागार होतात. मात्र, येलदरी वगळता अन्य ठिकाणी बारमाही पाणी राहत नसल्याने त्याचा परिणाम पक्षांच्या अधिवासावर होत आहे. दरवर्षी येलदरी धरणात परदेशी पक्षांचे आगमण होते. मात्र, अलिकडचे मानवी हस्तक्षेप वाढल्याने तालुक्यात जगंलाचे प्रमाण घटले आहे. तसेच पाणवठ्यांचे पुनर्जीवन केले नसल्याने ते गाळाने भरले आहेत. पाण्याची सोय आणि घनदाट वृक्षलागवड झाल्यास या परिसराला पूर्वी सारखे गतवैभव मिळुन पक्षांचा अधिवास वाढण्यास मदत होईल.


कवडा तलावात आढळून आलेले पक्षी...


(Greater Cormorant ) मोठा पाणकावळा २, (Tufted Duck) शेंडी बदक एक, (River Tern) नदी सुरय १६, (Northern Shoveller) थापटक्सया बदक १६, (Northern Pintail) तलवार बदक २, (Woolly necked Stork) पांढरा मानेचा करकोचा २, (Eurasian Spoonbill) चमचा ९,(Black Shouldered Kite) कापशी घार एक, (Spot Billed Duck) हळदीकुंकू बदक चार, (Green Bee eater) वेडा राघू पाच, (Ruddy Shelduck) चक्रवाक दोन, (Common Kingfisher) समान्य धीवर एक, (Little Grebe) टिबुकली एक, (Garganey) भुवई बदक ४८, (Common Pochard) छोटी लालसरी आठ, (Little Egret) छोटा बगळा पाच, (Red Wattled Lapwing) टिटवी तीन, (Black Drongo) कोतवाल एक, (House Crow) गावकावळा दोन, (Jungle Crow) डोमकावळा एक, (Gadwall) गढवाल ११, (Intermediate Egret) मध्यम बगळा २९, (Silver bill Munia) मुनिया एक, (Common Coot) वारकरी आठ व इतर काही पक्षांचा समावेश आहे.
....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com