
नांदेड : जनता माझी मी जनतेचा ही सामाजिक बांधिलकी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची आहे. पण उसनं ब्रीद घेणाऱ्या नेत्यांचा गेल्या वर्षी लोकसभा निवडणूकीत दारुण पराभव झाला. त्या धक्क्यातून अद्यापही जिल्ह्याचे पालकमंत्री सावरले नाहीत. त्यांना द्वेषाचा संसर्ग झाल्याने त्यांना सिनेटायझरची गरज आहे. तसेच माजी नगराध्यक्ष नळगे यांनी पुन्हा गरळ ओकली अशांना जनताच कायमचा मास्क लावील
असे प्रत्युत्तर कंधारचे उपनगराध्यक्ष जफरोद्दीन बहोद्दीन यांनी दिले.
जनतेत आत्मविश्वास निर्माण करण्याचा काळ
कंधार दौऱ्यात पालकमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विषयी द्वेषातुन वक्तव्य केले. वस्तूतः कोव्हीड -१९ कोरोना विषाणूचा हा काळ राजकारण करण्याचा नाही. तर सर्व राजकीय मतभेद विसरुन एकजुटीने या महामारीच्या रोगाला सामोरे जायची वेळ आहे. तसेच जिल्ह्यातील जनतेत आत्मविश्वास निर्माण करण्याचा काळ आहे, असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी वारंवार स्पष्ट सांगितले. परंतु नांदेड लोकसभा निवडणूकीत विद्यमान पालकमंत्री यांचा चिखलीकर यांनी पराभव केला. राज्याच्या राजकारणात चिखलीकर जायंट किलर ठरले. याचे शल्य पालकमंत्री व सहकाऱ्यांना बोचत आहे.
जनतेच्या मदतीला चिखलीकर धावले
प्रताप पाटील यांनी कोरोना सारख्या महामारीच्या काळात जिवाची पर्वा न करता गरीब-गरजवंतांना अन्नधान्य वाटप सुरु केले. बाहेर अडकून पडल्यांच्या ते सतत संपर्कात राहून सहकार्य करीत आहेत. भारतीय जनता पार्टीचे आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते आपापल्या भागात लोकांच्या मदतीला धावून जाताहेत. स्वतः चिखलीकर कुटूंब तन-मन-धनाने सर्वोतोपरी सहकार्य करीत आहेत. विविध उपाययोजनेसाठी' पीएमओ ऑफिस, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय आरोग्य मंत्री, वाहतूक मंत्री याशिवाय त्या त्या संबंधित विभागाचे मंत्री व अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून लोकांची कामे करीत आहेत. जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य विभाग यांना प्रोत्साहीत करीत आहेत. परंतु पालकमंत्री व सहकाऱ्यांना हे सगळं टोचत असावे. त्यामुळेच कोरोनाच्या काळात राजकारण सुरू केल्याचे जफरोद्दीन यांनी म्हटले आहे.
हेही वाचलेच पाहिजे....कोरोना : लॅब असूनही का होतोय ‘स्वॅब’ तपासणीला उशीर...?
किरोना विरुद्ध लढ्यात खंबीर भुमीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्या देशभरात कोरोनाचा फैलाव कमी झाला आहे. अशा खंबीर नेतृत्वाची देशाला गरज आहे. ही लोकभावना दृढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांची पोटदुखी आणखी वाढली आहे. जिल्ह्यात खासदार चिखलीकर व सहकारी अहोरात्र मदत करत आहेत. कोण कोणाला किती मदत करत आहेत हे सर्व जिल्ह्याला ज्ञात आहे. कोरोना काळात कधीच बाहेर न निघणाऱ्या माजी नगराध्यक्ष अरविंद नळगे यांनी पुन्हा तोंड उघडले आहे. यांना जनता ओळखून आहे. लोकसभेच्यावेळी वाट्टेल ते बोलणाऱ्या नळगेंना पाच वर्षांसाठी कायमचा 'मास्क' लोकांनी लावला आहे. त्यांनी फार तत्वज्ञान पाजळू नये, असा सल्ला जफारोद्दीन बाहोद्दीन यांनी दिला आहे.
परभवाच्या धक्यातून सावरले नाहीत
लोकसभा निवडणुकीच्या पराभवाच्या धक्क्यातून अद्याप न सावरलेल्या पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात नेहमीच सुडाचे राजकारण केले आहे. लोकसभा निवडणुकीत लोकांनी त्यांना पाच वर्षे ‘क्वांरटाईन’ केले. तरीही त्यांचा राजकीय द्वेष कायम दिसतो. त्यासाठी आता ‘सॅनेटायझर’ फवारण्याची गरज आहे. कोणीच वरचढ होऊ नये अशा भावनेतुन त्यांच्या समर्थकांनी गरळ ओकली. पण लोकांनाही इतिहास घडविला लोकनेते त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल आहे. त्याचे शल्य पालकमंत्री श्री चव्हाण सहकाऱ्यांना कदाचित सतत बोचत असावे?, असे ते म्हणाले.
स्वत:च्या राजकारणासाठी कार्यकर्त्यांचा वापर
कंधारचे माजीनगराध्यक्ष नळगे यांनी लोकसभा निवडणूकीत बेलगाम भाषण केले. आणि लोकांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षाला पराभूत केले. त्यांच्या नेत्यांनी नेहमीच या भागातील कार्यकर्त्यांना स्वतःच्या हितासाठी खासदार चिखलीकर यांच्या विरोधात झुजविले. यातुन त्यांचे राजकारण संपविले. तेच आता पुन्हा कोविड १९ चे राजकारण करत आहेत. या काळातही त्यांना द्वेषाचा संसर्ग असल्याचे दिसते. परंतु जनता हुशार आहे. पराभावाचे शल्य टोचणाऱ्या पालकमंत्र्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा द्वेष करण्यापेक्षा गरजवंताना जास्तीची मदत करावी. नळगे यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये. तोंडाला मास्क लावावा असे प्रत्युत्तर जफरोद्दीन बहोद्दीन यांनी दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.