उष्माघाताने नांदेडात दुसरा बळी 

प्रल्हाद कांबळे 
सोमवार, 3 जून 2019

नांदेड : यावर्षी जिल्ह्याच्या तापमानाने उच्चांग गाठला असून तीन दिवसात दोन जणांना उष्माघाताने मृत्यू झाल्याची नोंद पोलिस दप्तरी करण्यात आली आहे. यात एकजण रामतिर्थ तर दुसरी घटना भाग्यनगर ठाण्याच्या हद्दीत घडली. माधव वाघमारे (वय 40) हा उष्माघाताचा दुसरा बळी ठरला आहे. 

पावडेवाडी भागातील संतसेनानगर परिसरात राहणारा माधव वाघमारे हा आपल्या परिवारासह राहतो. तो जंगमवाडी येथील लॉयन्स नेत्रालयासमोर कृष्णसोहन नावाची सलुनची दुकान चालवित होता. तो रविवारी (ता. दोन) आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी वाशिम येथे गेला होता. लग्नानंतर तो सायंकाळी घरी परतला. दरम्यान प्रवासात त्याला ऊन लागले. घरी आल्यानंतर तो बेचैन झाल्याने प्रकृती अचानक खालावली. लगेच त्याला शासकिय रुग्णालय, विष्णुपूरी येथे दाखल केले. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्याच्या पार्थिवावर सोमवारी (ता. 3) सकाळी गोवर्धन घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्‍चात आई, पत्नी, एक मुलगा, एक भाऊ, वहिनी असा परिवार असून तो येथील सायन्स महाविद्यालयातील कर्मचारी गंगाधर वाघमारे यांचा भाऊ होत. या प्रकरणाचा तपास पोलिस नाईक आर. एस. नरवाडे हे करीत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 dies in nanded due to heat stroke