COVID-19 : हिंगोलीला दिलासा, आज केवळ एकच रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 जुलै 2020

शहरातील मस्तानशहानगरातील एका २२ वर्षीय युवकाच्या कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले

हिंगोली :  जिल्ह्याला आज (ता. आज) दिलासा मिळाला. केवळ एका व्यक्तीच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, एक जण कोरोनामुक्त झाला आहे.

शहरातील मस्तानशहानगरातील एका २२ वर्षीय युवकाच्या कोरोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले तर कळमनुरी येथील डेडिकेटेट सेंटर येथील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद यांनी दिली. कोरोनातून बरा झाला रुग्ण भोसी (ता. औंढा नागनाथ) येथील रहिवासी आहे तर बाधित तरुण गुलबर्गा येथून (कर्नाटक) हिंगोलीत परतला आहे. 

जिल्ह्यात आजपर्यंत हिंगोली कोविड-१९ चे एकूण २९७ रुग्णंची नोंद झाली आहेत. त्यापैकी २५२ रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. ४५ रुग्णांवर उपचार चालू आहेत.

कोरोनाचा 70 स्टार्टअपला फटका, 12 टक्के उद्योग बंद करण्याची नामुष्की

आयसोलेशन वॉर्ड जिल्हा सामान्य रुग्णालय हिंगोली येथे ६, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर आणि कोरोना केअर सेंटर वसमतमध्ये ८, कोरोना केअर सेंटर कळमनुरी येथे १२, कोरोना केअर सेंटर लिंबाळा अंतर्गत ७, कोविड हेल्थ सेंटर कळमनुरी येथे १, कोरोना केअर सेंटर सेनगाव येथे ६,  क्वॉरटाइन सेंटर औंढा नागनाथ येथे ४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. जिल्ह्यातंर्गत आयसोलेशन वॉर्ड, सर्व कोरोना केअर सेंटर आणि गाव पातळीवर तयार करण्यात आलेल्या क्वॉरटाइन सेंटर अंतर्गत एकूण ५,२६३ व्यक्तींना क्वारंटाइन करण्यात आले. त्यापैकी ४,६७० व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. ४,४३८ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

 मोदींच्या या 3 अपयशांचा हार्वर्ड स्कूलमध्ये अभ्यास होईल; राहुल गांधींचा टोला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1 new cases of COVID-19 in Hingoli