कोरोनाचा 70 स्टार्टअपला फटका, 12 टक्के उद्योग बंद करण्याची नामुष्की  

Startup India, India, Covid 19
Startup India, India, Covid 19

नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भारतातील छोट्या आणि मध्यम उद्योगासह स्टार्टअप्सला  मोठा फटका बसला आहे.  फिक्की आणि इंडियन एंजल नेटवर्क (आएएएन) यांनी संयुक्तपणे केलेल्या सर्वेक्षणानुसार कोरोनामुळे 70 टक्के स्टार्टअप उद्योग डपघाईला गेले आहेत. व्यवसायातील अनिश्चिततेसोबत सरकारी तसेच सामुदायिक प्राथमिकेमधील अप्रत्यक्ष बदलामुळे स्टार्टअप उद्योगातील वातावरण संघर्षमय झाले असून जिवंत राहण्यासाठी त्यांना चांगलीच कसरत करावी लागणार आहे.   कोविड 19 चा भारतीय स्टार्टअप्सवर नेमका काय आणि किती परिणाम झाला यासंदर्भात एक राष्ट्रव्यापी सर्वेक्षण करण्यात आले. यात  250 स्टार्टअप उद्योगांच्या परिस्थितीचा अभ्यास करण्यात आला.

यातील 70 टक्के स्टार्टअप उद्योजकांनी कोरोनाचा फटका बसल्याचे सांगितेल. एवढेच नाही तर 12 टक्के लोकांवर आपला उद्योगच बंद करण्याची वेळ ओढावली आहे. पुढील तीन ते सहा महिन्यात 22 टक्के स्टार्टअपकडे पुरेसा पैसा आहे. 68 टक्के स्टार्टअप खर्च कमी करण्यात येत आहे. लॉकडाऊनचा कालावधी आणखी काही दिवस असाच राहिला तर कामगार कपात करण्याचा निर्णय घ्यावा लागेल, असे  30 टक्के कंपन्यांनी म्हटले आहे. याशिवाय 43 टक्के स्टार्टअप उद्योगामध्ये  एप्रिल-जून या कालावधीमध्ये 20-40 टक्के वेतन कपातीचा निर्णयही घेण्यात आलाय.

33 टक्के स्टार्टअप उद्योजकांनी सध्याच्या घडीला गुंतवणूकदारांची गुंतवणूक करण्याची मनस्थिती नसल्याचे सांगितले. या सर्वेक्षणामध्ये 250 स्टार्टअप्ससह काही गुंतवणूकदारांनीही सहभाग घेतला होता.  कोविड 19 च्या प्रभावामुळे गुंतवणूक केली नसल्याचे 96 टक्के गुंतवणूकदारांनी म्हटले आहे. 92 टक्के गुंतवणूकदारांनी पुढील सहा महिने स्टार्टअपमध्ये गुंतवणूक कमी करणार असल्याचेही सांगितले. 59 टक्के गुंतवणूकदार चालू स्टार्टअपसोबत गुंतवणूक करण्यास पंसती दिली तर 41 टक्के गुंतवणूकदारांनी नव्या स्टार्टअपमध्ये पैसा गुंतवण्याची तयारी दर्शवली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com