ऊसतोड मजुराचा विजेच्या धक्क्याने मृत्यू 

dead_body
dead_body

नांदेड : ऊसवाहतुक करणाऱ्या ट्रकवर ऊसतोड कामगाराला ट्रकच्या कॅबीनवर असताना विद्युत शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. 20) दुपारी अडीच वाजता तामसा ते हदगाव रस्त्यावर साखर कारखाना परिसरात घडली. 

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीवरुन अक्षय बळीराम राणे (वय 22) रा. दिगळी ता. उमरखेड, जिल्हा यवतमाळ हा युवक ऊसतोड टोळीसोबत हदगाव येथील भाऊराव चव्हाण साखर कारखान्यावर आला होता. ऊस भरलेल्या ट्रकच्या कॅबीनवर बसुन ट्रक मागे घेण्यास ट्रक चालकास सांगत होता. यावेळी ट्रक (एमएच 26-7667) च्या चालकानी आपल्या ताब्यातील ट्रक हयगयीने व निष्काळजीपणे चालवून पाठीमागे घेतला.

यावेळी अक्षय राणे या मजुराला वरून जाणाऱ्या विद्यूत तारेचा स्पर्श झाला. यात त्याला जोराचा शॉक लागून तो खाली पडला व यातच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी बळीराम बापूजी राणे यांच्या फिर्यादीवरुन ट्रक चालक अजीम शेख आलम, ऊसतोड गुत्तेदार सागर कन्नावार आणि श्री. देशमुख दोघेही रा. उमरखेड यांच्या विरुध्द हदगाव ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक प्रदीप काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार साबळे हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com