उस्मानाबाद - उभ्या ट्राकला खाजगी बसची जोरदार धडक, 10 जण गंभीर

अर्जुन सुतार
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

येडशी (उस्मानाबाद) : लातूर - पुणे राज्य महामार्गावर येडशी पासून दोन किलोमीटर अंतरावर लातूरकडे निघालेल्या उभ्या ट्रकवर मागून खासगी बस धडकली. या अपघातात बसमधीस 22 प्रवासी जखमी असून 10 जण गंभीर असल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी (ता. 3) पहाटे ही घटना घडली. 

लातूरकडे प्लॅस्टिक पावडर घेऊन निघालेला ट्रक (क्र.एम.एच.11 ए एल 4291) डिझेल संपले म्हणून रस्त्यावरच उभा केला होता. पाठीमागून अमृता ट्रॅव्हल्सची खाजगी बस (क्र.एम.एच.24 ए बी 5588) लातूर कडे निघालेली होती. 
या बसने रस्त्यावर उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली.

घटनेची माहिती मिळताच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डाॅ.श्रीधर गिरी यांनी घटनास्थळी भेट दिली. परिसरातील येडशीसह ढोकी, पांगरी (ता.बार्शी), येरमाळा या येथून रूग्ण वाहिका आल्या. त्यातून जखमींना उस्मानाबाद येथील ग्रामिण रूग्णालयात पाठवण्यात आले. पंचायत समिती सदस्य संजय लोखंडे तसेच मिटू इंगळे, भागवत झोरी आदींनी जखमींना बाहेर काढून रूग्णालयात पाठवून देण्यासाठी मदत केली.

Web Title: 10 injured in truck bus accident at osmanabad