esakal | जीएसटी विरोधात व्यापाऱ्यांच्या बंदला १०० टक्के प्रतिसाद, हिंगोली कडकडीत बंद
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बंदमध्ये सर्व छोटे व मोठे व्यापारी प्रतिष्ठाणे, तसेच हॉटेल व्यावसायिक, हातफेरीवाले , फळ फुट व भाजीविक्रेते हे सुध्दा स्वयंस्फुर्तीने बंद मध्ये सहभागी झाले

जीएसटी विरोधात व्यापाऱ्यांच्या बंदला १०० टक्के प्रतिसाद, हिंगोली कडकडीत बंद

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : शासनाकडुन जीएसटी मध्ये होणारे बदल व कायद्यामध्ये सुधारणा करून हा कायदा सुलभ करावा या मागणीसाठी मराठवाडा चेंबर ऑफ ट्रेड अँण्ड कॉर्मस आणि कॉन्फ्रेडेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांनी पुकारलेल्या भारत बंदला हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघ , व कर सल्लागार संघटनाच्या वतीने शुक्रवारी ता.  २६ बंदला हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली शहरासह कळमनुरी, वसमत, बाळापुर, सेनगांव, औंढा, सिरसम, जवळा बाजार, कन्हेरगाव नाका, कुरूदा, वारंगा फाटा डिग्रस व इतर मोठ्या बाजारपेठामध्ये बंदला १०० टके प्रतिसाद मिळाला. 

बंदमध्ये सर्व छोटे व मोठे व्यापारी प्रतिष्ठाणे, तसेच हॉटेल व्यावसायिक, हातफेरीवाले, फळ फुट व भाजीविक्रेते हे सुध्दा स्वयंस्फुर्तीने बंद मध्ये सहभागी झाले. या बंदमध्ये हिंगोली जिल्हयातील सर्व व्यापारी अस्थापने व मेडीकल असोसिएशन, फर्टिलायझर बि - बियाणे असोसिएशन, किराणा होलसेल व रिटेल असोसिएशन, मशिनरी असोसिएशन, इलेक्ट्रीकल्स व इलेक्ट्रॉनिक असोसिएशन, कपडा व रेडिमेट असोसिएशन, हॉटेल असोसिएशन, स्वीटमार्ट असोसिएशन, जनरल व गिफ्ट आर्टीकल असोसिएशन, झेरॉक्स असोसिएशन, सोनेचांदी व्यापार असोसिएशन, प्रिंटींग व स्टेशनरी असोसिएशन, मोबाईल असोसिएशन यासह इतर सर्व असोसिएशनी व्यापारी महासंघाच्या बंदला पाठींबा दिला. 

तसेच व्यापाऱ्यांची एकच अपेक्षा केंद्र सरकार कडुन आहे की, जीएसटी कायदामधील होणारे बदल हे सुलभ व्हावे व व्यापाऱ्यांवर लावण्यात येणारे प्रस्तावित दंड व शिक्षा या बाबत केंद्र सरकारने सहानुभुतीपुर्वक विचार करावा. आजच्या घडीला जीएसटीमधील नवीन कायदे व सुधारणा यामुळे व्यापारकरणे अवघड होणार आहे व त्याचा त्रास व्यापाऱ्यांना होणार असुन आजच्या या भारत बंदच्या माध्यमाने सर्व व्यापारी एकजुट होवुन होणाऱ्या अन्यायाविरुध्द लढा देण्यासाठी एकत्रित होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. या बाबींची शासनाने दखल घेवुन व्यापाऱ्यांच्या हितासाठी योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी जिल्हाधीकारी यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 

निवेदनावर जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार गजानन घुगे, कार्यध्यक्ष रमेशचंद्र बगडीया, सचिव प्रकाशचंद सोनी, कोषाध्यक्ष सुदर्शन कंदी, शहराध्यक्ष पंकज अग्रवाल, शहर कार्यध्यक्ष सुधीर आप्पा सराफ, शहर सचिव आनंद निलावार, शहर कोषाध्यक्ष मुरलीधर हेडा, यांच्या सह इंदरचंदजी सोनी, धरमचंद बडेरा, शहाजी एकबाल हाजी मुसा,  सुभाषचंद्र  काबरा, रत्नदिपक सावजी,  गजानन कानडे दारकादास झंवर, प्रकाशचंद बगडीया, ओमप्रकाश हेडा, मधुसूदन मुंदडा, हरिप्रसाद, काबरा लक्ष्मीकांत गुंडेवार, शामसुंदर मुंदडा, सुभाषचंद्र लदनिया, जेठानंद  नैनवाणी, सुमीत चौधरी, जगजीत खुराणा आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संपादन- प्रल्हाद कांबळे

 

 

loading image