एक हजार बालके बीड जिल्ह्यात कुपोषित

malnutrician
malnutrician

बीड - जिल्ह्यात कुपोषित बालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. सध्या जिल्ह्यात 997 बालके कुपोषित असून, यामधील 137 बालके तीव्र कुपोषणामध्ये मोडतात, तर 860 बालके मध्यम प्रकारात येतात. जिल्ह्यात कुपोषित बालकांचा प्रश्‍न कायम असून, अंगणवाडीतून देण्यात येणारा पोषण आहार सर्वच बालकांपर्यंत पोचत नाही.

शून्य ते सहा वर्षे वयोगटातील बालकांचे कुपोषण मोजण्यासाठी आयसीडीएस व आरोग्य विभागाचे वेगवेगळे निकष आहेत.

आयसीडीएसकडून मुलांच्या वयानुसार वजनाच्या आधारे मध्यम (एमयूडब्ल्यू) व तीव्र (एसयूडब्ल्यू) कुपोषित, तर आरोग्य विभागाकडून उंचीनुसार वजन किंवा दंडघेरानुसार एमएएम व एसएएम मुलांची निवड केली जाते. त्यामुळे आरोग्य विभागाच्या निकषांनुसार एसएएम श्रेणीत येणाऱ्या मुलांनाच उपचार व इतर सुविधा दिल्या जातात. एमएएममध्ये मोडणाऱ्या बालकांना पाहिजे तशा सुविधा देण्यात येत नाहीत. यामुळे हीच बालके हळूहळू कमकुवत होत जातात. सध्या जिल्ह्यात एमएएममध्ये मोडणाऱ्या बालकांची संख्या 860 आहे. एसएएममध्ये मोडणाऱ्या बालकांची संख्या 137 आहे. जिल्ह्यातील कुपोषित बालकांची संख्या कमी करण्यासाठी विशेष प्रभावी उपाययोजना राबविण्याची गरज आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com