शहराच्या डोक्‍यावर 10 हजार टन कचरा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

औरंगाबाद - शहरातील कचराकोंडी आता महापालिकेच्या आवाक्‍याबाहेर गेली आहे. नागरिकांचा रोष वाढल्यामुळे सध्या पडून असलेल्या सुमारे दहा हजार टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटदाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी महापालिकेने निविदा प्रसिद्ध केली असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे नारेगाव, हर्सूल पडेगाव, नक्षत्रवाडी व शहरातील मध्यवर्ती जकातनाका, रमानगर येथे पडून असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठीचे सादरीकरण कंत्राटदाराला सोमवारी (ता. नऊ) करावे लागणार आहे.

शहरात १६ फेब्रुवारीपासून अभूतपूर्व कचराकोंडी निर्माण झाली आहे. गेल्या चार महिन्यांत महापालिकेला कचऱ्यावर तोडगा काढता आलेला नाही. अनेकवेळा कचऱ्यासाठी डेडलाइन जाहीर करण्यात आल्या. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जनतेची माफी मागण्याची वेळ आली; मात्र कचराप्रश्‍न अद्याप संपलेला नाही. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्याने पुन्हा एकदा कचऱ्याच्या प्रश्‍नाची तीव्रता वाढली आहे. पावसात भिजलेल्या कचऱ्यातून प्रचंड दुर्गंधी सुटली असून, अनेक ठिकाणी तर आळ्या निघत आहेत.

माशांच्या प्रादुर्भाव वाढल्याने रोगराईची भीती व्यक्त केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी नागरिकांनी रस्त्यावर उतरून कचऱ्याच्या विरोधात आंदोलन केले होते. नगरसेवकही उपोषणाचा इशारा देत आहेत. चार महिन्यांपासून कचऱ्याचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांच्या संयमाचा कधीही स्फोट होऊ शकतो, या भीतीने आता प्रशासनाने पावले उचलली आहेत. सध्या पडून असलेल्या व आगामी काळात दररोज निघणाऱ्या सुमारे साडेचारशे टन कचऱ्यावर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रक्रिया करण्यासाठी प्रस्ताव मागविले आहेत. सोमवारी सकाळी या कंपन्यांना सादरीकरण करावे लागणार आहे. ज्या कंपनीचे सादरीकरण चांगले राहील त्यांच्यासोबत पुढील पाच महिन्यांसाठी करार केला जाणार असल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. 

निविदांचा वेळ करणार कमी
महापालिकेने यापूर्वी कचरा संकलन व विल्हेवाट, मशीन खरेदी, कचरा प्रक्रिया केंद्रांवर सिव्हिल वर्क अशा विविध निविदा काढल्या आहेत. या निविदा सादर करण्यासाठी सव्वा महिन्याचा वेळ प्रशासनाने दिला होता; मात्र निविदांचा अवधी कमी करण्यात येणार असल्याचेही महापौरांनी नमूद केले.

Web Title: 10000 tone garbage in city