अबब! बीड जिल्ह्यात लॉकडाउनमध्ये १००८ गुन्हे, २४१७ आरोपींवर गुन्हा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 May 2020

पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी या सुचनांच्या अंमलबजावणींचे काटेकोर नियोजन करत धडक कारवाया केल्या. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत १००८ गुन्हे नोंदविण्यात आले असून सुमारे ३ हजार ४१७ आरोपींचा यात समावेश आहे. 

बीड -  लॉकडाउनच्या काळात जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केलेल्या संचारबंदीतील सुचनांचे उल्लंघन केल्याचे मंगळवार (ता. २६) पर्यंत जिल्ह्यात १००८ गुन्हे नोंद झाले. यामध्ये तब्बल ३४१७ आरोपींचा समावेश आहे. या काळात मद्यविक्रीला बंदी असतानाही देशी-विदेशीसह हातभट्टी दारु विक्रीचेही ५८५ गुन्हे नोंद करुन ७३३ आरोपींकडून तब्बल ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी जिल्ह्यात साथरोग प्रतिबंध कायदा १८९७ लागू केला. जमावबंदी व संचारबंदी आदेशही जारी करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, अप्पर पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांनी या सुचनांच्या अंमलबजावणींचे काटेकोर नियोजन करत धडक कारवाया केल्या. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत १००८ गुन्हे नोंदविण्यात आले असून सुमारे ३ हजार ४१७ आरोपींचा यात समावेश आहे. 

हेही वाचा - सख्ख्या भावाच्या सात एकरांतील उसावर फिरविला ट्रॅक्टर

हातभट्टीसह देशी-विदेशी दारु विक्री विरुद्धही धडक कारवाया करण्यात आल्या. लॉकडाउन सुरू झाल्यापासून २५ मे पर्यंत जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत अवैध दारू विक्रेते, हातभट्टी दारू बनविणाऱ्या एकूण ५८५ कारवाया करण्यात आल्या. या कारवायांत ७३३ जणांविरुध्द दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल करुन ७६ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: 1008 crimes in lockdown in Beed district

Tags
टॉपिकस
Topic Tags: