Soybean Scam : भोकरदनमध्ये एक कोटीचा सोयाबीन घोटाळा; दहा जणांवर गुन्हा ,बनावट सातबारा, खोटा पीकपेरा जोडून शासनाला गंडा
Agricultural Scam : जालना जिल्ह्यात बनावट सातबारा व खोट्या पीकपेरावरून हमीभावात सोयाबीन विक्री करून शासनाची तब्बल एक कोटी दोन लाखांची फसवणूक उघडकीस आली. संस्थेचे अध्यक्ष, सचिव आणि संचालक यांच्यासह दहा जणांविरुद्ध पारध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारध (ता. भोकरदन) : जिल्हातील अनुदान वाटप घोटाळ्यानंतर हमीभावात सोयाबीन विकण्यासाठी बनावट सातबारा, खोटा पीकपेरा जोडून शासनाची एक कोटी दोन लाख ३८ हजारांची फसवणूक करण्यात आली.