‘ १०८ ' रूग्णवाहिका अनेकांची जीवनदायीनी 

प्रल्हाद कांबळ 
गुरुवार, 21 जून 2018

नांदेड : मागील चार वर्षापासून जिल्ह्यात २५ रूग्णवाहिका रूग्णांना तसेच अपघातात सापडलेल्यांना जीवदान देण्याचे महत्वाचे काम करीत आहेत. विशेष जिल्ह्यातील सर्वच भागातून सर्वसामान्य गरोदर महिलांना याचा लाभ घेता आला. या काळात त्यांनी २० हजार ४४० मातांना अडचणीच्या काळाता रूग्णालयात दाखल केले. या दरम्यान ७२९ प्रसुती धावत्या रूग्णावाहिकेत झाल्या. त्यामध्ये २३ मातांनी जुळ्यांना जन्म घातला. चार वर्षात ८२ हजार ६३५ रुग्णांना जीवदान देण्यात आल्याचे जिल्हा व्यवस्थापक डॉ. सुनील कुलकर्णी यांनी सांगितले. 

जिल्ह्यात २४ मार्च २०१४ रोजी एएचएम आणि बीव्हीजी यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ९३७ अत्याधुनीक १०८ रूग्णवाहिकेची मुहूर्तमेढ रोवली. या रूग्णवाहिकेत दोन तज्ञ डॉक्टर्स आणि चालक असे कर्तव्यावर असतात. यातून जिल्ह्याला २५ रूग्णवाहिका मिळाल्या. या सर्व रुग्णवाहिकांनी व त्यामधील कर्मचारी, डॉक्टर्स यांनी अथक परिश्रम घेत रूग्णांना शक्य तितक्या लवकर सेवा देण्याचा प्रयत्न करतात. जिल्ह्याच्या मुख्य रस्त्यावर व अंतर्गत भागातील सर्वसामान्य रूग्णांनी ही जीवनदायीनी ठरली आहे. अतिशय दूर्गम भागात जाऊन ही सेवा दिल्या जात आहे. यात सर्पदंश, विषबाधा, ऱ्हदयविकार, गरोदर माता, अपघात, नैसर्गीक वीज, आत्महत्या, मारहाण यासह आदी रूग्णांना वेळेत उपचार मिळतो. त्यामुळे अनेकांना आपले प्राण वाचविता आले.
 
Web Title: '108' ambulance is save life of many people